माणुसकीची भावना जपणाऱ्या एकांकिकांचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:24 AM2020-12-31T04:24:30+5:302020-12-31T04:24:30+5:30

मनोरंजन मंडळ, श्री. दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलच्यावतीने आयोजित स्पर्धेत बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ संघाच्या ...

Presentation of one-act plays that preserve the spirit of humanity | माणुसकीची भावना जपणाऱ्या एकांकिकांचे सादरीकरण

माणुसकीची भावना जपणाऱ्या एकांकिकांचे सादरीकरण

Next

मनोरंजन मंडळ, श्री. दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलच्यावतीने आयोजित स्पर्धेत बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ संघाच्या ‘रंगबावरी’ या एकांकिकेने रसिकांची दाद मिळवली. अल्पवयातच लग्न करून विधवा झालेल्या मुलीची तरल कथा यामध्ये मांडण्यात आली आहे. अभिरुची कोल्हापूर संघाने सद्य:स्थितीवरील ‘क्वारंटाईन’ ही एकांकिका सादर केली. त्यामध्ये अचानक लागलेल्या संचारबंदीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे लोक कसे एका ठिकाणी अडकतात आणि त्यांच्यात संशयाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे येणारा दुरावा या एकांकिकेने दाखवला. थिएटर कल्ट कल्याण संघाने ‘टेलिपंथी’ या एकांकिकेमध्ये आपल्या तरुण मुलाच्या आत्महत्येमुळे दु:खी झालेल्या आणि एकप्रकारे या दु:खाचे ओझे घेऊन जगणाऱ्या दाम्पत्याची कथा दाखवली आहे.

प्रेरणा वाचन मंदिर इचलकरंजी संघाने ‘शक्यतांचा कोलाज’ ही एकांकिका सादर केली. कथालेखन करणाऱ्या एका लेखकाचे विचार, नायक व नायिका अशा पात्ररुपात प्रकट होतात आणि नंतर त्यांच्यात मतभेद निर्माण होतात, अशी कथा मांडण्यात आली आहे. माणुसकी फौंडेशन इचलकरंजी संघाने ‘म्हातारा पाऊस’ या एकांकिकेत म्हाताऱ्या आई-वडिलांना सोडून शहरात राहणारा मुलगा आणि आपल्या आई-वडिलांविषयीचा त्याचा निष्काळजीपणा यावर आधारित एकांकिका होती. शेवटी कलाकार मंडळी पुणे या संघाने ‘दुकान कोणी मांडू नये’ ही एकांकिका सादर केली. त्यामध्ये टीव्ही चॅनेलचे पत्रकार यांची वाचनभान जपणारी कथा यामध्ये दाखवली आहे.

श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या स्पर्धेस इचलकरंजी, सांगली व कोल्हापूरचे प्रेक्षक उपस्थित होते.

(फोटो ओळी)

३०१२२०२०-आयसीएच-०१

थिएटर कल्ट कल्याण संघाने ‘टेलिपंथी’ ही एकांकिका सादर केली.

Web Title: Presentation of one-act plays that preserve the spirit of humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.