जनता बझारप्रकरणी अकरा जणांचे म्हणणे सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 04:43 PM2017-08-09T16:43:27+5:302017-08-09T16:48:02+5:30

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्युमर्स स्टोअर्स (जनता बझार)च्या सन २००८-२०१२ या कालावधीत तत्कालीन संचालकांनी केलेल्या नुकसानीची ‘कलम ८८’ कारवाई सुरू झाली आहे. कलम ७२ (३) नुसार आरोपपत्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून बुधवारी काही पदाधिकाºयांनी म्हणणे सादर केले.

Presented by eleven people in public Bazar case | जनता बझारप्रकरणी अकरा जणांचे म्हणणे सादर

जनता बझारप्रकरणी अकरा जणांचे म्हणणे सादर

Next
ठळक मुद्देसंचालकांनी केलेल्या नुकसानीची ‘कलम ८८’ कारवाई सुरू अकरा संचालकांचे म्हणणे सादर २३ आॅगस्टला अंतिम सुनावणीआरोपपत्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्युमर्स स्टोअर्स (जनता बझार)च्या सन २००८-२०१२ या कालावधीत तत्कालीन संचालकांनी केलेल्या नुकसानीची ‘कलम ८८’ कारवाई सुरू झाली आहे. कलम ७२ (३) नुसार आरोपपत्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून बुधवारी काही पदाधिकाºयांनी म्हणणे सादर केले.

जनता बझारच्या जुन्या संचालक मंडळावर दोन वेगवेगळ्या नुकसानीबाबत ‘८८’ची कारवाई सुरू आहे. सन २००८ ते २०१२ या कालावधीत भाड्यापोटीचे ८१ लाख रुपये संस्थेकडे आलेले नाहीत.

याबाबतची नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी शिरोळचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगांवे यांना प्राधिकृत केले आहे. त्याचबरोबर रॉकेल विक्रेत्यांकडून ८१ हजारांचा टीडीएस वसूल न करता संस्थेने हे पैसे भरले आहे. त्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी शहर उपनिबंधक टी. बी. बल्लाळ यांची नियुक्ती केली आहे.

प्रदीप मालगांवे यांनी कलम ७२ (३) नुसार आरोपपत्र निश्चितीचे काम सुरू केले आहे. संबंधितांकडून लेखी अथवा तोंडी म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये १९ संचालक व एक व्यवस्थापकाचा समावेश आहे. बुधवारी एका पदाधिकाºयाने म्हणणे सादर केले असून अद्याप नऊजण म्हणणे द्यायचे आहेत.

दि. २३ आॅगस्टला अंतिम सुनावणी घेतली जाणार असून यामध्ये उर्वरित पदाधिकाºयांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष जबाबदारी निश्चितीचे काम सुरू होणार आहे.

Web Title: Presented by eleven people in public Bazar case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.