राजाराम महाविद्यालयातील दुर्मिळ ग्रंथसंपदेचे जतन आणि संवर्धन करा : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:38+5:302021-06-09T04:31:38+5:30

कोल्हापूर : येथील राजाराम महाविद्यालयास पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट देऊन कामकाज आणि सुविधांबाबत आढावा घेतला. यावेळी ग्रंथालयातील दुर्मिळ ...

Preserve and nurture the rare bibliography of Rajaram College: Satej Patil | राजाराम महाविद्यालयातील दुर्मिळ ग्रंथसंपदेचे जतन आणि संवर्धन करा : सतेज पाटील

राजाराम महाविद्यालयातील दुर्मिळ ग्रंथसंपदेचे जतन आणि संवर्धन करा : सतेज पाटील

Next

कोल्हापूर : येथील राजाराम महाविद्यालयास पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट देऊन कामकाज आणि सुविधांबाबत आढावा घेतला. यावेळी ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथसंपदेची डिजिटायझेशन करून ग्रंथसंपदेचे जतन आणि संवर्धन करण्याची सूचना त्यांनी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांना केली. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ पाठवावा, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देवू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

प्राचार्य डॉ. ए. एस. खेमनार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महाविद्यालयाला दिलेल्या निधीतून करण्यात आलेल्या भौतिक सुविधांची माहिती दिली. गतवर्षी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात आलेल्या कामांची पालकमंत्री पाटील यांनी पाहणी केली. राजर्षी शाहू सभागृह, संगणक लॅब आणि अभ्यासिका याची पाहणी केली. या वर्षाच्या प्रस्तावित कामांनाही निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

दरम्यान, पालकमंत्री पाटील यांनी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथसंपदेची पाहणी केली. यावेळी ग्रंथांचे पहिल्या टप्प्यात लॅमिनेशन करून घ्यावे. पुढील टप्प्यात स्कॅनिंग करून डिजिटायझेशन करावे. दुर्मिळ संदर्भ ग्रंथ माफक फीमध्ये महाविद्यालयाबाहेरील विद्यार्थ्यांना संशोधन आणि अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी केली.

प्राचार्य डॉ. खेमनार म्हणाले, महाविद्यालयातील ग्रंथालयात विविध भाषेतील स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील सुमारे १२ हजार दुर्मिळ ग्रंथ आहेत. यावेळी विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड, डॉ. एल. डी. जाधव, प्रा. संजय पाठारे, प्राचार्य डॉ. महादेव नरके उपस्थित होते.

फोटो : ०८०६२०२१- कोल - सतेज पाटील

राजाराम महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांची पाहणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. यावेळी उदय गायकवाड, डॉ. एल. डी. जाधव, प्रा. संजय पाठारे, डॉ. महादेव नरके आदी उपस्थित होते.

Web Title: Preserve and nurture the rare bibliography of Rajaram College: Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.