‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:26 AM2021-01-16T04:26:36+5:302021-01-16T04:26:36+5:30
सरवडे : बिद्री साखर कारखान्याला आजपर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गाळप, सर्वाधिक दराचे विक्रम, यशस्वी सहवीज प्रकल्प या ...
सरवडे : बिद्री साखर कारखान्याला आजपर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गाळप, सर्वाधिक दराचे विक्रम, यशस्वी सहवीज प्रकल्प या सर्वांचे श्रेय हे कष्टकरी ऊस उत्पादक व कामगार यांना जाते. आज सहकार क्षेत्रात साखर विभागात राज्यातील अग्रगण्य संस्थेने बिद्री कारखान्यास तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविले. हा सन्मान या कष्टकरी ऊस उत्पादक आणि कामगार यांच्या योगदानामुळे मिळाला आहे, असे गौरवोद्गार बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी काढले. वसंतदादा संशोधन संस्था मांजरी-पुणे यांच्या वतीने सन २०१९-२० या हंगामातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष के. पी. पाटील व कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांचा शाहू कामगार संघटना व सर्व कामगार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कामगार प्रतिनिधी भीमराव किल्लेदार म्हणाले, बिद्री साखर कारखान्यात कामगार प्रामाणिकपणे व एकदिलाने काम करीत आहे. त्यामुळे ‘बिद्री’च्या यशात कामगारांचा वाटा महत्त्वाचा आहे. कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांचा सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार व कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांचा लेबर ऑफिसर शिवराज मोरे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवाजी केसरकर, संघटनेचे अध्यक्ष संजय मोरबाळे, उपाध्यक्ष व्ही. डी. व्हरकट, अजित आबिटकर, शांताराम पाटील, मधुकर वागरे, अशोक फराकटे, सातापा बोडके, संभाजी फराकटे, सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार, लेबर ऑफिसर शिवराज मोरे, शेती अधिकारी बी. एन. पाटील, चिफ अकौंट एस. ए. कुलकर्णी, महेशराव जाधव, सिव्हिल अधिकारी बी. बी. पाटील, को-जनचे महेश सलगर, एल. जी. कल्याणकार, आनंदराव पाटील यांच्यासह कामगार उपस्थित होते.
अजित आबिटकर यांनी आभार मानले. .......
फोटो
बिद्री साखर कारखान्याच्या प्रधान कार्यालयात कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांचा सत्कार करताना अधिकारी व कामगार वर्ग उपस्थित होते.