टेबल टेनिसपटू वैष्णवी सुतार यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 06:18 PM2021-12-03T18:18:02+5:302021-12-03T18:21:40+5:30
आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिसपटू वैष्णवी सुतार यांनी यापुर्वी आशियाई, राष्ट्रकुल व पॅरा ऑलिम्पिकसह अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यासह राष्ट्रीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करीत देशाचे नाव उज्वल केले आहे
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनची आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिसपटू वैष्णवी सुतार यांचा दिव्यांग दिनाचे (World Disability Day) औचित्य साधून शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोवीद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वैष्णवी सुतार यांना उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू म्हणून सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
नवी दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले प्रमुख उपस्थित होते.
वैष्णवी या कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या टेबलटेनिस पटू आहेत. त्यांनी यापुर्वी आशियाई, राष्ट्रकुल व पॅरा ऑलिम्पिकसह अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यासह राष्ट्रीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करीत देशाचे नाव उज्वल केले आहे. त्यांचा या कामगिरीची दखल घेत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने त्यांना उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना के.एस.ए. अध्यक्ष मालोजीराजे व माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रोत्साहन, तर संग्राम पाटील, पती विनायक सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.