राष्ट्रपती रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर, वाहतूक मार्गात बदल, कोणते मार्ग सुरु-बंद राहणार..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 05:23 PM2024-07-26T17:23:32+5:302024-07-26T17:25:48+5:30

कोल्हापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रविवारी (दि २८) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यामुळे काही मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात ...

President on his visit to Kolhapur on Sunday, changes in traffic routes | राष्ट्रपती रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर, वाहतूक मार्गात बदल, कोणते मार्ग सुरु-बंद राहणार..वाचा

राष्ट्रपती रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर, वाहतूक मार्गात बदल, कोणते मार्ग सुरु-बंद राहणार..वाचा

कोल्हापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रविवारी (दि २८) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यामुळे काही मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याअनुशंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी वाहतूक नियमन निर्देश व आदेश जारी केले.

कोल्हापूर विमानतळ, श्री अंबाबाई दर्शन, सर्कीट हाऊस, ताराराणी चौक, तावडे हॉटेल ते वारणानगर कोडोली अन् परत कोल्हापूर विमानतळ या मार्गावरुन राष्ट्रपतींचा ताफा मार्गक्रमण करणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

या मार्गावर वन वे 

दुर्गा सिग्नल चौक ते खाँसाब पुतळा चौक
खरी कॉर्नर ते मिरजकर तिकटी
बिनखांबी ते खरी कॉर्नर
मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर 

वळविण्यात आलेले मार्ग 

बोरपाडळे हॉटेल येथुन कोडोली, वारणेच्या दिशेने येणारी सर्व प्रकारची वाहतुक कोल्हापूरच्या दिशेने वळविण्यात येईल.
शहापुर माले फाटा येथुन वारणेच्या दिशेने जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही माले गावाकडे किंवा यु टर्न घेवुन बोरपाडळेकडे वळविण्यात येईल. 
कोडोली पोलीस ठाण्यासमोरील पोखले फाटा येथे वारणेच्या दिशेने कोणत्याही प्रकारची वाहतुक सोडली जाणार नाही. त्यांना पोखले गावाकडे वळविले जाईल. किंवा यु टर्न घेवुन बोरपाडळेकडे वळविण्यात येईल.
वारणा तालीम येथील बॅरीकेटींग पासुन एकही वाहन पुढे सोडले जाणार नाही.
माले गाव, दानेवाडी फाटा, प्लामाक फाटा,  म्हसोबा देवालय येथून कोडोलीच्या दिशेने एकही वाहन सोडले जाणार नाही.

बंद मार्ग :

राष्ट्रपती महोदय यांचा कॉनव्हॉय विमानतळ येथुन महालक्ष्मीकडे रवाना होताना एचएसपी ऑफिस समोर पुण्याच्या दिशेने जाणारी आणि अथायु हॉस्पिटलच्या समोर कागलच्या दिशेने जाणारी पुणे बेंगलोर एनएच- ४ महामार्गाची वाहतुक काही काळ थांबविण्यात येईल.
कॉनव्हॉय सर्कीट हाऊस येथुन तावडे हॉटेल मार्गे वाठार ब्रिज येथुन वारणा नगर करीता रवाना होताना लक्ष्मी टेकडी, एचएसपी ऑफिस, हॉटेल स्टायलँड, उंचगाव रेल्वचे ब्रिज येथे काही काळ पुणे-बेंगलोर एनएच-४ महामार्गाची पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतुक काही काळ थांबविण्यात येईल. तसेच पुणे बेंगलोर एनएच-४ महामार्गावरील कागलकडे जाणारी वाहतुक ही किणी टोल नाका, शेर-ए-पंजाब धाबा समोर काही काळ थांबवली जाईल.

वारणानगर वाठार ब्रिज मार्गे विमानतळाकडे जाताना पुणे-बेंगलोर एनएच-४ हायवेवरील कागलच्या दिशेने जाणारी वाहतुक किणी टोल नाका, शेर-ए-पंजाब धाबा, नागाव फाटा, सांगली फाटा ओव्हर ब्रिज, पंचगंगा ब्रिज येथे काही काळ थांबविण्यात येईल. तसेच पुणे बेंगलोर एनएच-४ महामार्ग वरील पुण्याकडे जाणारी वाहतुक ही लक्ष्मी टेकडी, एचएसपी ऑफिस समोर काही काळ थांबवली जाईल. वारणानगरकडे जाताना आणि वारणानगरकडुन विमानतळकडे येताना यादरम्यान पुणे बेंगलोर, एनएच-४ हायवेवर असणा-या सर्व वाहनांनी महामार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करावा. 

वारणानगर येथील पार्किंगची सोय :

वारणानगर येथे होणा-या कार्यक्रमाकरीता वारणा साखर कारखाना गाडी अड्डा येथे पार्कींगची सोय करण्यात आली आहे. या पार्कीगकरीता येणारी वाहने सकाळी १० वाजण्यापुर्वीच येतील. यानंतर वाठार ते वारणानगर आणि कोडोली ते वारणानगर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. 
राष्ट्रपती महोदयांचा कॉनव्हॉय विमानतळ ते श्री अंबाबाई मंदिर ते सर्किट हाऊस ते वारणानगर ते विमानतळ या दरम्यान येताना आणि जाताना संपुर्ण कॉनव्हॉय मार्गावर महोदयांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन आवश्यकतेनुसार वाहतुक चालु बंद करण्यात येईल.

नो पार्किंग झोन :

विमानतळ ते शाहु टोल नाका
शाहु टोल नाका ते केएसबीपी चौक ते ताराराणी चौक (रस्त्याच्या दोन्ही लेन)
ताराराणी चौक ते धैर्यप्रसाद चौक (रस्त्याच्या दोन्ही लेन)
धैर्यप्रसाद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय चौक (रस्त्याच्या दोन्ही लेन)
 जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते दसरा चौक ते बिंदु चौक
बिंदु चौक ते मिरजकर तिकटी ते खरी कॉर्नर ते श्री अंबाबाई मंदिर
धैर्यप्रसाद चौक ते सर्किट हाऊस
ताराराणी चौक ते तावडे हॉटेल

हे निर्देश राष्ट्रपतींचा दौरा सुरु होवुन संपेपर्यंत फक्त कॉनव्हॉयमधील वाहनांकरीता ये-जा करण्याच्या कालावधीत एकेरी मार्ग शिथिल करण्यात येत आहेत. याशिवाय आवश्यकतेनुसार महामार्गावरील वाहतुक तसेच कोल्हापूर शहरातील इतर रस्ते, चौक याठिकाणची वाहतुक सुरु बंद करणे अगर वाहतुक वळविण्यात येणार आहे.

Web Title: President on his visit to Kolhapur on Sunday, changes in traffic routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.