अध्यक्ष, सचिव प्रकरणास राजकीय रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:18 AM2021-06-21T04:18:12+5:302021-06-21T04:18:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तारदाळ : भारत निर्माण पाणीपुरवठ्याचे अध्यक्ष अशोक चौगुले व सचिव पवन शिंदे यांच्याविरुद्ध अनेक भ्रष्टाचाराचे आरोप ...

President, Secretary Political color to the matter | अध्यक्ष, सचिव प्रकरणास राजकीय रंग

अध्यक्ष, सचिव प्रकरणास राजकीय रंग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

तारदाळ : भारत निर्माण पाणीपुरवठ्याचे अध्यक्ष अशोक चौगुले व सचिव पवन शिंदे यांच्याविरुद्ध अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये त्यांना बारा लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यामुळे अध्यक्ष व सचिव यांनी गैरव्यवहार लपवण्यासाठी संबंधित प्रकरणास राजकीय रंग देत असल्याचा आरोप संचालक चंद्रकांत चौगुले यांनी केला.

आंदोलक व संचालकांनी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना तारदाळ व खोतवाडी ग्रामपंचायतीकडे कारवाईची मागणी केली. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायत व गटविकास अधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याचा सवाल संचालकांनी उपस्थित केला. त्यामुळे अध्यक्ष व सचिव यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी किसन शिंदे, अमित खोत, रणजित माने, शीतल मगदूम उपस्थित होते.

Web Title: President, Secretary Political color to the matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.