शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत मुंबईतून दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:19 AM2021-06-05T04:19:33+5:302021-06-05T04:19:33+5:30

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत मुंबईतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संबंधितांना सूचना दिल्याचे सांगण्यात आले. मात्र शनिवारी ...

Pressure from Mumbai regarding resignation of Shiv Sena office bearers | शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत मुंबईतून दबाव

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत मुंबईतून दबाव

Next

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत मुंबईतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संबंधितांना सूचना दिल्याचे सांगण्यात आले. मात्र शनिवारी होणारी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीमधील बैठक होणार नसल्याचे सांगण्यात आले.

समाजकल्याण समितीच्या सभापती स्वाती सासने यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. प्रवीण यादव यांच्या राजीनाम्यासाठी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र माजी आमदार सत्यजित पाटील हे त्यांचे कार्यकर्ते बांधकाम समिती सभापती हंबीरराव पाटील यांच्या राजीनाम्यासाठी फारसे आग्रही नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून निरोप गेल्याचे सांगण्यात आले.

दुधवडकर हे शनिवारी कोल्हापुरात येणार नसले तरी त्यांनी या तिघांचेही राजीनामे घेण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव आणि विजय देवणे यांच्यावर सोपवली आहे.

Web Title: Pressure from Mumbai regarding resignation of Shiv Sena office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.