कोगनोळीमार्गे होणाऱ्या अवैध वाहतुकीला बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:44 AM2021-02-06T04:44:09+5:302021-02-06T04:44:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोगनोळी : गेल्या अनेक दिवसांपासून गावातून होणाऱ्या अवैध वाहतुकीबाबत कोगनोळीकरांनी आक्रमक भूमिका घेतली होती. जिल्हाधिकारी, तहसीलदार, ...

The pressure will be on the illegal traffic through Kognoli | कोगनोळीमार्गे होणाऱ्या अवैध वाहतुकीला बसणार चाप

कोगनोळीमार्गे होणाऱ्या अवैध वाहतुकीला बसणार चाप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोगनोळी : गेल्या अनेक दिवसांपासून गावातून होणाऱ्या अवैध वाहतुकीबाबत कोगनोळीकरांनी आक्रमक भूमिका घेतली होती. जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन व टोल प्रशासन यांना निवेदन देऊन यावर तोडगा न निघाल्यास ६ फेब्रुवारी रोजी महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. वाहनांचे गावात गुलाबपुष्प देऊन उपहासात्मक स्वागतही करण्यात आले होते. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांशी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे महामार्ग रोको तात्पुरता स्थगित करण्यात आल्याचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी जाहीर केले. त्यामुळे कोगनोळीकरांनी सुरू केलेल्या आंदोलनाला यश आले असून गावातून होणाऱ्या अवैध वाहतुकीला काही प्रमाणात लगाम बसणार आहे.

कोगनोळी व शेजारील गावांतील नित्याने प्रवास करणाऱ्या वाहनांना स्थानिक पास उपलब्ध करून देणे, कोगनोळी फाटा या ठिकाणी ग्रामपंचायत, टोल प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या वतीने सुरक्षा व्यवस्था उभी करून पास नसणाऱ्या वाहनांना गावात प्रवेश न देणे, आदी मुद्द्यांवर तहसीलदारांशी झालेल्या चर्चेमध्ये एकमत झाले. यावेळी अवैध वाहतुकीबाबतच्या आंदोलनास ग्रामस्थांनी तसेच विविध संघटनांबरोबरच पत्रकार संघटनेनेही केलेल्या सहकार्याबद्दल पंकज पाटील यांनी ऋण व्यक्त केले व सहा तारखेचा आयोजित महामार्ग रोको स्थगित केल्याचे जाहीर केले.

यावेळी महसूल निरीक्षक अजित वनजोळे, ग्रामविकास अधिकारी डी. बी. जाधव, मारुती कोळेकर, परशुराम चावरे, युवराज पाटील, तलाठी पुजारी, पीएसआय बी. एस. तळवार, टोल व्यवस्थापक नानासाहेब गायकवाड, उत्तम पाटील, कृष्णात खोत, अनिल चौगुले, आदी उपस्थित होते.

फोटो ओळ : कोगनोळी येथील अवैध वाहतुकीबाबत तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.

(छाया : बाबासो हळिज्वाळे)

Web Title: The pressure will be on the illegal traffic through Kognoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.