रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:24 AM2021-04-21T04:24:40+5:302021-04-21T04:24:40+5:30
कोरोना महामारीत रेडमेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. या इंजेक्शनची खुल्या बाजारात विक्री होत नसून, रुग्णांच्या आवश्यकतेनुसार आणि रुग्णालयांच्या मागणीनुसार प्रशासनाकडून ...
कोरोना महामारीत रेडमेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. या इंजेक्शनची खुल्या बाजारात विक्री होत नसून, रुग्णांच्या आवश्यकतेनुसार आणि रुग्णालयांच्या मागणीनुसार प्रशासनाकडून या इंजेक्शनचा पुरवठा होत आहे, असे असताना हे इंजेक्शन औषध दुकानातून आणण्याचे पत्र रुग्णांच्या नातेवाइकांना का दिले जात आहे. डॉक्टरांच्या पत्रामुळे रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक धावपळ करतात. त्यामुळे मेडिकलमधून उपलब्ध होत नसल्यामुळे काळ्या बाजारातून चढ्या दराने हे इंजेक्शन रुग्णांच्या नातेवाइकांना घ्यावे लागत आहे. या इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे अन्वेषणने कारवाई केली आहे. या इंजेक्शनबाबत रुग्णालयांची बैठक घ्यावी. रुग्णालयांना देण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनवर शासनाचा शिक्का मारावा, जेणेकरून त्यांची पुन्हा विक्री होऊ नये, अशा सूचना आमदार जाधव यांनी केल्या आहेत.