मोबाईल टॉवर दुरुस्तीला अटकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:21+5:302021-07-16T04:17:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिंगणापूर येथे मोबाईल टॉवर दुरुस्तीसाठी जाण्यास अटकाव केल्याबद्दल करवीर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिंगणापूर येथे मोबाईल टॉवर दुरुस्तीसाठी जाण्यास अटकाव केल्याबद्दल करवीर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सदाशिव संकपाळ, संभाजी बाजीराव कदम, बाजीराव शिंदे, प्रकाश पिंजरे (रा. शिंगणापूर, ता. करवीर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मोबाईल कंपनीचे तंत्रज्ञ आमजद मुल्लाणी व मधुकर सातगोंडा हेरवाडे (वय ४५, रा. धरणगुत्ती, ता. शिरोळ) हे मोबाईल टाॅवरच्या दुरुस्तीसाठी गेले असता, त्यांना टॉवर कंपाऊंडमध्ये जाण्यास आरोपींनी अटकाव केला होता. त्यामुळे हेरवाडे यांनी करवीर पोलिसात तक्रार दिली.
दुचाकी चोरी
कोल्हापूर : व्हीनस कॉर्नरनजीक असेंब्ली रोडवर उभी केलेली दुचाकी अज्ञाताने चोरुन नेल्याचा प्रकार बुधवारी घडला. याबाबत दुचाकीमालक रवींद्र नागेश कुलकर्णी (वय ६०, रा. सोपेश्वर अपार्टमेंट, फडणीस बोळ) यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
सायकलची चोरी
कोल्हापूर : येथील न्यू पॅलेस परिसरातील महावीर कॉलनीनजीक उभी केलेली काळ्या रंगाची सुमारे आठ हजार रुपये किमतीची सायकल अज्ञाताने चोरली. ही घटना रविवारी घडली. याबाबत सायकलचे मालक अक्षय शंकरराव पोवार (वय ३२, रा. जागृतीनगर) यांनी चोरीची तक्रार शाहुपूरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुचाकीची मोपेडशी धडक
कोल्हापूर : कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावर केर्ली (ता. करवीर) येथे मोपेड व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. विलास उर्फ लालू पांडुरंग हांडे (वय ३४, रा. उत्तरे, ता. पन्हाळा) व शुभम टेंबुगडे (रा. कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी भरधाव दुचाकी हयगयीने चालवल्याबद्दल शुभम टेंबुगडे याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.