पर्यावरण ऱ्हास अर्थव्यवस्थेस बाधक

By admin | Published: February 3, 2017 12:39 AM2017-02-03T00:39:06+5:302017-02-03T00:39:06+5:30

एच. एम. देसरडा : शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे चर्चासत्र

Preventing the Environmental Destructive Economy | पर्यावरण ऱ्हास अर्थव्यवस्थेस बाधक

पर्यावरण ऱ्हास अर्थव्यवस्थेस बाधक

Next

कोल्हापूर : भारतीय अर्थव्यवस्था ही पर्यावरणावर आधारित आहे. मात्र, सध्या पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास अर्थव्यवस्थेला बाधक ठरणारा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी गुरुवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. आर. जी. दांडगे होते. विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रूरल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित चर्चासत्राचा विषय ‘निश्चिलनीकरण आणि केंद्रीय अर्थसंकल्प’ असा होता. प्रा. देसरडा म्हणाले, नोटाबंदी नव्हे, तर नोटा बदली झाली आहे. सरकारचा नोटाबंदीचा डाव फसला आहे. आपल्या देशाचा समता मूलक शाश्वत विकास झाला पाहिजे,
तरच देशाची अर्थव्यवस्था सुधारणार आहे. नोटाबंदीमुळे सध्या बँक व्यवस्था ढासळली आहे. अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी, स्मार्ट इंडिया योजनांना कमी महत्त्व दिले आहे. ठरावीक कंपन्यांना मोठे करण्याचा सरकारचा उद्देश आहे.
प्रा. दांडगे म्हणाले, नोटाबंदीचे आपल्यावर काही दूरगामी परिणाम होतात का ? हे पहावे लागणार आहे. कार्यक्रमात अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. एस. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. कविता वड्राळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शशिकांत पंचगल्ले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


डिजिटलचा बडेजाव करणारी दिशादृष्टी
नोटाबंदीच्या सावटाखाली प्रस्तुत केलेल्या अर्थसंकल्पाची दिशादृष्टी ज्या डिजिटल पद्धतीचा बडेजाव, कॅशलेसचा गवगवा करणारी आहे, ही गोरगरिबांच्या हिताची नसल्याचे मत प्रा. देसरडा यांनी वार्तालापमध्ये व्यक्त केले. शेतकरी कामगार पक्षाने हा वार्तालाप आयोजित केला होता. त्यात प्रा. देसरडा म्हणाले, अर्थसंकल्पातील तथ्यांचा बारकाईने विचार केला असता देशातील सामान्य जनतेला काही विशेष लाभ मिळेल असे जाणवत नाही. या कार्यक्रमास सुनीलकुमार सरनाईक, संभाजीराव जगदाळे, बाबूराव कदम, मधुकर हरेल, अजित सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.

Web Title: Preventing the Environmental Destructive Economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.