विध्वंसक वृत्ती रोखणे शिक्षणातून शक्य

By admin | Published: February 17, 2016 12:20 AM2016-02-17T00:20:02+5:302016-02-17T00:44:38+5:30

शरद पवार : मिरजेत जवाहर हायस्कूल, अरबी, उर्दू, मराठी शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

The prevention of destructive attitude is possible through education | विध्वंसक वृत्ती रोखणे शिक्षणातून शक्य

विध्वंसक वृत्ती रोखणे शिक्षणातून शक्य

Next

मिरज : तरुणांना चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी बाह्यशक्ती कार्यरत आहेत. तरुणांचा विघातक कृत्यांकडे का ओढा आहे, याचे चिंतन होणे आवश्यक असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सांगितले. मिरजेत जवाहर हायस्कूल व अरबी उर्दू मराठी शाळेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमात ते बोलत होते. नवीन पिढीला विध्वंसक वृत्तीपासून दूर ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या शिक्षणाची सोय केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
पवार म्हणाले की, तरुणांना चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी बाह्यशक्तींकडून पैसा व ताकदीचा वापर होत आहे. कोणत्याही दहशतवादी संघटनेचे समर्थन अयोग्य आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राने इराकवर अन्याय, अत्याचार करणेही अयोग्य आहे. नवीन पिढी देशाचे भवितव्य आहे. त्यामुळे त्यांच्या चांगल्या शिक्षणाची व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे. चांगल्या शिक्षणासाठी चांगल्या शैक्षणिक संस्था आवश्यक आहेत. अशा संस्था उभ्या राहिल्या, तर विध्वंसक वृत्तीला रोखणे शक्य आहे. वैद्यकीय केंद्रासोबत शैक्षणिक केंद्र म्हणूनही मिरजेचा विकास व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की, मुस्लिम समाजास शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याची सच्चर समितीची शिफारस आहे.
मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी आम्ही १०० कोटी रूपये उपलब्ध करून दिले.
मात्री मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार सोहेल लोखंडवाला यांनी, मुस्लिम समाजाच्या विकासासाठी चांगल्या पद्धतीचे शिक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगितले. माजी आमदार विलासराव शिंदे, उद्योजक इरफान फर्निचरवाला, डॉ. कासिम इमाम, डॉ, अल्लाउद्दीन, माजी आमदार हाफिज धत्तुरे, सुरेश आवटी, हसीना नायकवडी, आयेशा नायकवडी, अतहर नायकवडी, मुख्याध्यापिका रिजवाना मुजावर, नगरसेविका संगीता हारगे, मालन हुलवान, अभिजित हारगे उपस्थित होते.
माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी आभार मानले. यावेळी झालेल्या ‘कौमी एकता मुशायरा’ कार्यक्रमात इफ्तेसाम बेपारी, समीना नरवाडे, अझरूद्दीन बेपारी, आफ्रीन आवटी, साकिब काजी, फैयाज हंगड, मिदहत पिरजादे यांनी मुशायरा सादर केला. (वार्ताहर)

दिलजमाई : जयंत पाटील-नायकवडींची
खा. शरद पवार यांनी कार्यक्रमापूर्वी इलियास नायकवडी, इद्रिस नायकवडी व जयंत पाटील यांची स्वतंत्र बैठक घेतली. बैठकीत जयंत पाटील व नायकवडी यांच्यात पॅचअप् केल्याची चर्चा होती. त्यानंतर कार्यक्रमातही इलियास नायकवडी व जयंत पाटील यांनी दिलजमाईचे सूर आळविले. जयंत पाटील यांनी आपल्याला मदत केल्याचे सांगत, त्यांना उद्देशून, आमच्यासोबतची तक्रार विसरावी, आम्हीही रूसवा सोडण्यास तयार आहोत, या आशयाचा शेर नायकवडी यांनी यावेळी ऐकविला. जयंत पाटील यांनीसुध्दा, इलियास नायकवडी हे आमचे मार्गदर्शक असल्याचे सांगत, इद्रिस नायकवडी यांचे नाव न घेता, आम्हाला सोडून गेलेल्यांसाठी दारे उघडी असल्याचे सांगितले.

Web Title: The prevention of destructive attitude is possible through education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.