प्रदूषण रोखणे हे आद्य कर्तव्य
By admin | Published: October 10, 2015 12:23 AM2015-10-10T00:23:17+5:302015-10-10T00:32:53+5:30
संजय हरणे : किर्लोेस्कर चित्रपट महोत्सवात नागेशकर, उपळेकर, केमकर यांना वसुंधरा पुरस्कार
कोल्हापूर : आजच्या जीवनात प्रदूषण रोखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे मत नागरिका कागल पंचताराांकित औद्योगिक वसाहत येथील सूत गिरणीचे व्हाईस प्रेसिडेंट संजय हरणे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. ते कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व किर्लोस्कर उद्योगसमूहातर्फे आयोजित सहाव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवप्रसंगी बोलत होते.
यावेळी हॉटेल व्यावसायिक उज्ज्वल नागेशकर यांना २०१४ चा, तर २०१५चा वसुंधरा मित्र पुरस्कार मुक्त छायाचित्रकार राजा उपळेकर, कार्यकर्ता पराग केमकर यांना व वसुंधरा गौरव पुरस्काराने आदर्श सहेली मंच, राजारामपुरी येथील युवक मित्रमंडळ, कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवान यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी किर्लोस्कर आॅईल इंजिन्सचे प्रकाशराव होते. यावेळी सिनेचित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत जोशी उपस्थित होते.संजय हरणे म्हणाले, आज विविध घटकांमधून प्रदूषण होत आहे. जे औद्योगिक वसाहतीमधून सांडपाणी अथवा वायू हे घटक जे कारणीभूत ठरत आहे. ते कशा प्रकारे रोखता येईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात सध्या सुमारे १७ टक्के प्रदूषण विविध घटकांद्वारे होते. त्यामुळे भविष्यासाठी जल, वायू, ध्वनी यांचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. २०१४ ला उज्ज्वल नागेशकर हे जम्मू-काश्मीर येथे मदतीसाठी गेल्याने त्यांचा पुरस्कार यावर्षी देण्यात आला. पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. दिलीप
बापट यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कारानंतर लघुपटाला सुरुवात झाली. (प्रतिनिधी)