दळप कांडप गिरण्यांचे दर भडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:29 AM2021-02-17T04:29:37+5:302021-02-17T04:29:37+5:30
दळप कांडपाचे दर भडकल्याने सहकारी संस्थेच्या गिरण्या सोडण्याचा पवित्रा ग्रामस्थ घेऊ लागल्याने सहकारी संस्था अडचणीत ...
दळप कांडपाचे दर भडकल्याने सहकारी संस्थेच्या गिरण्या सोडण्याचा पवित्रा ग्रामस्थ घेऊ लागल्याने सहकारी संस्था अडचणीत येऊ लागल्या आहेत.
सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेतर्फे दळप कांडप गिरण विभाग चालविला जातो. संस्था सभासदांच्या हिताकरिता गिरण विभागांची निर्माती झाली. कोरोनाच्या काळानंतर दळप कांडप गिरण्यांचे दर वाढविण्यात आले.
ग्रामीण भागात सहकारी संस्थेचे पूर्वी दळप कांडप गिरण्याचे दर माणसी २०० ते २२० रुपये होते. मात्र, सध्या काही सहकारी संस्थांनी दळप कांडप यांचे धान्यांचे दर प्रतिकिलो पाच रुपये केल्याने आता जादा माणसं असलेल्या कुटुंबांना दळप कांडप करण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. हजार ते दीड हजार रुपये वार्षिक आकारणी होऊ लागल्याने सहकारी संस्थांच्या दळप कांडप गिरण्या परवडत नसल्याने नागरिक खासगी दळप कांडप गिरण्याकडे वळू लागले आहेत. सहकार खात्याच्या दुर्लक्षपणामुळे दळप कांडप गिरण्यांनी दळप कांडपाचे दर वाढवले. कोरोनाच्या काळानंतर ग्रामीण भागात दळप कांडप गिरण्यांच्या दरात अचानकपणे सहकारी संस्थांनी केलेल्या दरवाढीमुळे सहकारी संस्था आर्थिक अडचणीत येऊ लागल्या आहेत. सहकारी संस्थेचा गिरण विभाग बंद करून खासगी दळप कांडप गिरण्याकडे ग्रामस्थांचा कल वाढू लागला आहे.