शिरोळ येथे कृषीदिनानिमित्त शेतकऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:01+5:302021-07-03T04:17:01+5:30

शिरोळ : शिरोळ पंचायत समिती कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने पंचायत समितीत कृषी दिन साजरा ...

Pride of farmers on the occasion of Agriculture Day at Shirol | शिरोळ येथे कृषीदिनानिमित्त शेतकऱ्यांचा गौरव

शिरोळ येथे कृषीदिनानिमित्त शेतकऱ्यांचा गौरव

Next

शिरोळ : शिरोळ पंचायत समिती कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने पंचायत समितीत कृषी दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन सभापती दीपाली परीट यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी पंचायत समिती सदस्य मल्लाप्पा चौगुले, संजय माने, मीनाक्षी कुरडे, मिनाज जमादार, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, कृषी अधिकारी सुनील रूपनर व सुरेश दानवाडकर उपस्थित होते. प्रास्ताविक कृषी अधिकारी सुनील रूपनर यांनी केले. त्यानंतर तालुका पातळी सोयाबीन पीक स्पर्धा विजेते शेतकरी व वसंतराव नाईक कृषीमित्र पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका कृषी अधिकारी भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. विस्ताराधिकारी अनिकेत भिलवडे यांनी आभार मानले.

उदगाव येथे प्रक्षेत्र भेट आयोजित करण्यात आली होती. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी बिटले यांनी ठिबक सिंचनाद्वारे खत बचत यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर रोपवाटिका व गीर गाय गोठा यांना प्रक्षेत्र भेट देण्यात आली.

फोटो - ०२०७२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - शिरोळ येथे पंचायत समितीमध्ये कृषीमित्र पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Pride of farmers on the occasion of Agriculture Day at Shirol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.