'रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटी'चा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:29 AM2021-09-07T04:29:45+5:302021-09-07T04:29:45+5:30
गडहिंग्लज : हौसिंग फायनान्स क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल एका नामांकित वृत्तवाहिनीतर्फे येथील श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीचा विशेष पुरस्काराने ...
गडहिंग्लज : हौसिंग फायनान्स क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल एका नामांकित वृत्तवाहिनीतर्फे येथील श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.
मुंबई येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन ' रवळनाथ'चा गौरव झाला. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, संचालक प्राचार्य एस. एन. देसाई, महेश मजती व सुशांत करोसे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हौसिंग फायनान्स क्षेत्रातील मल्टिस्टेट दर्जा प्राप्त झालेली देशातील ही एकमेव संस्था आहे. सध्या महाराष्ट्र व कर्नाटकात मिळून संस्थेच्या एकूण ९ शाखा आहेत. गडहिंग्लज येथील प्रधान कार्यालयासह ४ शाखा स्वमालकीच्या इमारतीत आहेत. घरबांधणीसाठी सध्या महिला व सैनिकांना ८.५०, तर इतरांना ८.७५ टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा केला जात आहे.
आजअखेर एकूण सभासद ८४१, ठेवी ३२५ कोटी, कर्जे २२७ कोटी, गुंतवणूक १२६ कोटी, स्वनिधी २० कोटी ६१ लाख, वार्षिक व्यवसाय ६५२ कोटी, तर १ कोटी ३९ लाखाचा नफा आहे. २५ वर्षांत संस्थेने अडीच हजारांहून अधिक घरांच्या बांधकामासाठी अर्थसाहाय्य केले आहे.त्यामध्ये सुमारे २०० घरे सैन्यदलातील जवानांची आहेत.
-----
फोटो ओळी- गड
मुंबई येथे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते 'रवळनाथ'चे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी संचालक उपस्थित होते.