पुजाऱ्याकडे खंडणीची मागणी, मंदिरातील मदतीनासवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 02:27 PM2017-11-29T14:27:33+5:302017-11-29T14:33:10+5:30
ओढ्यावरील रेणुका मंदिरातील पुजाऱ्याकडे लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मंदिरातील मदतीनासवर राजारामपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित मदतनीस दत्ता महादेव पवार (वय ५०, रा. शिवगंगा कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पुजारी सुनिल विलास मेढे (वय ३३, रा. सुभाषनगर) यांनी फिर्याद दिली.
कोल्हापूर : ओढ्यावरील रेणुका मंदिरातील पुजाऱ्याकडे लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मंदिरातील मदतीनासवर राजारामपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित मदतनीस दत्ता महादेव पवार (वय ५०, रा. शिवगंगा कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पुजारी सुनिल विलास मेढे (वय ३३, रा. सुभाषनगर) यांनी फिर्याद दिली.
अधिक माहिती अशी, सुनिल मेढे हे रेणुका मंदिरामध्ये पुजाऱ्याचे काम करतात. तर संशयित दत्ता पवार हा मदतनीस म्हणून काम करतो. एक वर्षापूर्वी पवार याने सुनिल यांचेकडे लाख रुपयांची मागणी केली होती. आपल्याकडे पैसे नाहीत असे सांगताच त्याने तगादा लावला होता. पैसे दिले नाहीस तर मंदिरात येवू देणार नाही अशी धमकी दिली होती. त्यानंतर सुनिल यांनी भितीपोटी पन्नास हजार रुपये दिले.
काही दिवस गप्प राहून पुन्हा महिन्याला दहा हजार रुपये देण्याची मागणी पवार याने केली. तसेच मंदिराच्या वहीवाटीवरुन उदय शेंडे व मदनआई जाधव यांच्यात वाद आहे, त्याचे न्यायालयीन कामकाज बघू नकोस, मंदिराचा ताबा शेंडे यांचेकडे द्यायचा नाहीतर तुला ठार मारणार अशी धमकी दिली.
दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सुनिल मंदिरात गेले असता पवारने दहा हजार रुपये व प्रताप माने यांच्या दागिन्यांची मागणी केली. त्यास नकार देताच त्याने मारहाण केली. पवारच्या त्रासाला कंटाळून सुनिल याने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकृत्ती ठिक झालेनंतर त्यांनी राजारामपूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.