कोल्हापूर वनविभाग कार्यालयाकडून मागविला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 09:17 PM2021-03-01T21:17:55+5:302021-03-01T21:20:26+5:30

forest department Kolhapur- वनविभागाच्या सोनतळी येथील जखमी वन्यजीव प्राण्यांच्या उपचार केंद्रातील सावळागोंधळाची वरिष्ठ कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून, तीन दिवसांत संबंधित प्रकाराचा अहवाल अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी (वन्यजीव) यांनी मागितला आहे.

The Principal Forest Conservator requested a report from the Kolhapur Forest Department Office | कोल्हापूर वनविभाग कार्यालयाकडून मागविला अहवाल

कोल्हापूर वनविभाग कार्यालयाकडून मागविला अहवाल

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर वनविभाग कार्यालयाकडून मागविला अहवाललोकमतच्या वृत्ताची दखल

आदित्य वेल्हाळ

कोल्हापूर : वनविभागाच्या सोनतळी येथील जखमी वन्यजीव प्राण्यांच्या उपचार केंद्रातील सावळागोंधळाची वरिष्ठ कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून, तीन दिवसांत संबंधित प्रकाराचा अहवाल अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी (वन्यजीव) यांनी मागितला आहे.

सोनतळी येथील उपचार केंद्रात येणाऱ्या जखमी प्राण्यांवर उपचार त्यापुढील प्रक्रियेसाठी शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची गरज आहे. मात्र हे जोखमीचे काम मानद डॉक्टरांकडून केले जाते, याबाबत लोकमतने सोमवारच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.

या वृत्ताची दखल अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी घेतली. हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत याबाबतचा सविस्तर अहवाल तीन दिवसांत सादर करण्याची आदेश कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांना दिले.

वनविभागाच्या कारभारावर प्राणिमित्र संतप्त

लोकमतने वनविभागाचा भोंगळ कारभार सर्वांसमोर आणल्यानंतर कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सातारा जिल्ह्यातील प्राणिमित्रांनी आपल्याकडे असणारे यासंदर्भातील पुरावे देण्याची तयारी दाखविल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वनविभागाच्या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

सेवाभावी वृत्तीने वनविभागाचे काम प्रामाणिक करत आहे. मी आल्यापासून जखमी प्राण्यांचा बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तरीही काही मंडळी माझ्याबद्दल षडयंत्र करून बदनामी करत आहेत. माझ्याकडे मनुष्यबळ कमी असून, वनविभागाने त्याची पूर्तता केली तर यापेक्षाही चांगले काम करू, असे मानद डॉक्टरांनी सांगितले.


कोल्हापूर वनविभागाबाबत वृत्त पाहिल्यानंतर प्रथम दर्शनी हे प्रकरण गंभीर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तत्काळ कोल्हापूर वनसंरक्षकांना याबाबत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
-सुनील लिमये,
अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) )

Web Title: The Principal Forest Conservator requested a report from the Kolhapur Forest Department Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.