बनावट लेबल लावून जीन्स विकणाऱ्या दुकानावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:27 AM2021-03-01T04:27:05+5:302021-03-01T04:27:05+5:30
याबाबतची फिर्याद नेत्रिका कन्सल्टिंगचे मन्यालु सुब्रमण्यम वेंकटेश (वय ४२) बेंगलोर यांनी गांधीनगर पोलिसांत दिली. मन्यालु वेंकटेश ...
याबाबतची फिर्याद नेत्रिका कन्सल्टिंगचे मन्यालु सुब्रमण्यम वेंकटेश (वय ४२) बेंगलोर यांनी गांधीनगर पोलिसांत दिली.
मन्यालु वेंकटेश यांना गांधीनगर येथील मचमोअर गारमेंट या दुकानात लेविस कंपनीच्या लेबलखाली बनावट माल विक्री होत असल्याची माहिती मिळाली. कॉपीराइट ॲक्टखाली या दुकानात छापा टाकला असता लेविस इंजिनिअर्ड जीन्स रेग्युलर लेव्ही स्ट्रॉस अँड को या कंपनीचे लेबल बनावट मालावर प्रिंट करून लेविस कंपनीचा आहे असे भासवून वेगवेगळ्या रंगाचे व वेगवेगळ्या साईज असलेल्या ३२५ नग जीन्स पँट प्रत्येकी किंमत २४९९ असा ८ लाख १२,१७५ रुपयांचा माल मिळून आला. याप्रकरणी कॉपीराइट ॲक्टखाली दुकान मालक सुमित लक्ष्मणदास तलरेजा याच्यावर गुन्हा नोंद झाला. अधिक तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक भांडवलकर करीत आहेत.