‘सुरभि’ कला केंद्रावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 01:08 AM2019-04-13T01:08:05+5:302019-04-13T01:08:10+5:30

कोल्हापूर : सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली तीनपानी जुगार खेळला जात असल्याच्या संशयावरून उमा टॉकीज परिसरातील ‘सुरभि’ क्रीडा व सांस्कृतिक ...

Print on 'Surabhi' Art Center | ‘सुरभि’ कला केंद्रावर छापा

‘सुरभि’ कला केंद्रावर छापा

Next

कोल्हापूर : सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली तीनपानी जुगार खेळला जात असल्याच्या संशयावरून उमा टॉकीज परिसरातील ‘सुरभि’ क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या कला केंद्रावर शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी पथकासह छापा टाकला. यावेळी कला केंद्राचा अध्यक्ष विश्वजित ऊर्फ गुंडू सावंत याच्यासह जुगार खेळणाऱ्या ६५ जणांना अटक करण्यात आली. याशिवाय ३५ दुचाकी, ५० मोबाईल, १३ लाख रोकड, विदेशी मद्याचा साठा, गॅस सिलिंडर व जुगाराचे साहित्य असा सुमारे २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली उमा टॉकीज परिसरातील ‘सुरभि’मध्ये राजरोस जुगार चालतो, अशी तक्रार पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे नागरिकांनी केली होती. त्यांनी शहर पोलीस उपअधीक्षक कट्टे, करवीरचे डॉ. प्रशांत अमृतकर यांना कारवाईचे आदेश दिले. त्यांच्यासह शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, राजारामपुरीचे सुनील पाटील, लक्ष्मीपुरीचे वसंत बाबर, जुना राजवाड्याचे प्रमोद जाधव यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास छापा टाकला. इमारतीच्या दुसºया मजल्यावर हे कला केंद्र सुरूअसते. अचानक पोलिसांचा फौजफाटा घुसल्याने सगळेच सैरभैर झाले. पळून जायचे, तर मुख्य प्रवेशद्वाराचे लोखंडी गेट पोलिसांनी बंद केले होते. आतमध्ये दोन खोल्यांमध्ये १५ टेबलवर खेळ सुरू होता. प्रत्येक टेबलला सहा व्यक्ती बसून, तीनपानी रमी खेळताना रंगेहात पकडले. पोलीस उपअधीक्षक कट्टे यांनी सगळ्यांना आहे त्या जागेवरच बसून राहण्यास सांगितले. प्रत्येक व्यक्तीची अंगझडती घेऊन मोबाईल, पैसे, दुचाकीच्या चाव्या पोलिसांनी काढून घेतल्या. सांस्कृतिक इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. मंडळाचा अध्यक्ष विश्वजित सावंत याच्याकडून रमी जुगार कशाप्रकारे चालतो, त्याची माहिती घेतली. या संपूर्ण कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. सांस्कृतिक कला केंद्रासमोर पोलिसांच्या वाहनांचा ताफा पाहून शहरात एकच खळबळ उडाली. बघ्यांनी या परिसरात मोठी गर्दी केल्याने मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
अटक झालेल्यांची नावे अशी,
संशयित विश्वजित ऊर्फ गुंडू जगन्नाथ सावंत (वय ४०), लक्ष्मण बाबजीनाथ कांबळे (४४, रा. जवाहरनगर, इचलकरंजी), राजू वसंतराव खटावकर (५६, शुक्रवार पेठ), महेश राजेंद्र गिरी (३०, रा. हुपरी), शकील महंमदहुसेन मुल्ला (४७, रा. जुना बुधवार पेठ), अमोल दिलीप जाधव (३५, रा. मंगळवार पेठ) दीपक तुकाराम गुंडप (४६, साळोखेनगर, कोल्हापूर) राजू धोंडिराम जाधव (५४, पुलाची शिरोली), बबन कृष्णात लाडे (३९, वाडीरत्नागिरी, पन्हाळा ), आनंदराव आण्णासाहेब पाटील (३८, रा. कोयना वसाहत, कराड), कुमार सदाशिव आवळे (४५, रा. शिंगणापूर), अरुण नारायण जाधव (५४, जुना बुधवार पेठ), विनायक आनंदा होगाडे (३०, कागल), साजीत अजीज महात (३३, रा. शनिवार पेठ), आनंदा हिंदुराव पवार (६५, कराड, ता. सातारा) पप्पू तुकाराम मछले (४२, रा. बाईचा पुतळा, राजारामपुरी), आयान लियाकत किल्लेदार (२३, रा. मच्छी मार्केट, गडहिंग्लज), कृष्णा निवृत्ती देवडे (४४, जवाहरनगर, इचलकरंजी), विठ्ठल गजानन ओतारी (५४, रा. आझाद गल्ली, कोल्हापूर), अरविंद शंकर कोकणे (६९, रा. जवाहरनगर, कोल्हापूर), बळवंत ज्ञानदेव पारखे (६४, रा. खिंडी व्हरवडे, राधानगरी), रामचंद्र विलास काटकर (२९, जवाहरनगर, कोल्हापूर) तुकाराम कृष्णा हजारे (५२, मडिलगे बुद्रुक, भुदरगड), अमोल लक्ष्मण पाटील (पिंपळे तर्फ सातवे, पन्हाळा), अमोल बाळासो निकम (३४, रा. चिले कॉलनी, कोल्हापूर), काकासो नामदेव हवालदार (३९, पाचगाव) शिवाजी रामचंद्र मोहिते (५३, रा. रंकाळा), संतोष विक्रम आडनाईक (४१, आयसोलेशनजवळ, कोल्हापूर) जयवंत वसंत पाटील (३५, रा. योगेश्वरी कॉलनी पाचगाव) दिलीप नेमीनाथ शेट्टी (५९, प्रतिभानगर), दत्ता मारुती सांगावकर (४३, रा. वड्डवाडी, कोल्हापूर), संभाजी रघुनाथ पोवार (३४, कोडोली, पन्हाळा) भाऊसो गोपाळ चव्हाण (४५, शिंदी, गडहिंग्लज), दिलावर इब्राहिम अत्तार (४५, बुरूड गल्ली, गडहिंग्लज), अमोल नंदकुमार सावंत (२८, शुक्रवार पेठ) राजू बापू कांदेकर (४४, रा. राजारामपुरी), आनंदा गुंडू जगदाळे (५८, रा. कोगनोळी), सरफराज हुसेन हेनाळे (२३, रा. २३ नदाफ गल्ली, गडहिंग्लज), अनिल चंद्रकांत धनवडे (५३, कनाननगर) युवराज मारुती मगदूम (४५, रा. एकोंडी, कागल) संभाजी रवींद्र कोटे (३६, पन्हाळा), जावेद रशीद शेख (३०, कडगाव, गडहिंग्लज) रमेश जयराम आवळे (४०, रा. मंगळवार पेठ).
संजय कदमला मोक्का लावणार?
जागामालक सराईत गुन्हेगार संजय कदम याच्या इमारतीच्या तळमजल्यावरील कार्यालयात बेकायदेशीर मद्यसाठा व गॅस सिलिंडर मिळाले. त्याच्या कार्यालयातून जुगार अड्ड्यावर नियंत्रण ठेवले जात होते. त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित संजय कदम हा मटका, जुगार क्लब चालक असून, तो सराईत आहे. त्याच्यासह त्याच्या साथीदारांवर ‘मोक्का’ कारवाई करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे.

Web Title: Print on 'Surabhi' Art Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.