‘जीवनधारा’च्या मुख्य वितरकावर छापा -: सरकारी औषधांची विक्री प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 01:08 AM2019-07-18T01:08:25+5:302019-07-18T01:08:42+5:30

औषध पुरवठा करणाºया ओम सर्जिकल्स या मुख्य वितरकावर बुधवारी अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून त्याच्याकडील औषधसाठ्याची तपासणी केली. हे प्रकरण मिटविण्यासाठी सहभागी असणाऱ्यांची धावाधाव सुरू होती.

 Printed on the main distributor of 'Vishvadhara' | ‘जीवनधारा’च्या मुख्य वितरकावर छापा -: सरकारी औषधांची विक्री प्रकरण

‘जीवनधारा’च्या मुख्य वितरकावर छापा -: सरकारी औषधांची विक्री प्रकरण

Next
ठळक मुद्दे ‘ओम सर्जिकल्स’च्या औषधसाठ्याची दिवसभर तपासणी

कोल्हापूर : सरकारने पुरविलेल्या औषधांची ‘सीपीआर’मधील औषध दुकानांतून विक्री झालेल्या प्रकरणातून रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. ‘नॉट फॉर सेल’ची औषधे विक्री करणाऱ्या जीवनधारा मेडिकल स्टोअर्सला औषध पुरवठा करणाºया ओम सर्जिकल्स या मुख्य वितरकावर बुधवारी अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून त्याच्याकडील औषधसाठ्याची तपासणी केली. हे प्रकरण मिटविण्यासाठी सहभागी असणाऱ्यांची धावाधाव सुरू होती.

सरकारने शासकीय रुग्णालयांसाठी पुरविलेली व बाहेर विक्रीसाठी परवानगी नसलेली (नॉट फॉर सेल) औषधे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या आवारातील जीवनधारा औषध दुकानातून ‘सीपीआर’मधील रुग्णांना विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. १५) उघडकीस आला.
महिलेच्या प्रसूती शस्त्रक्रियेवेळी वापरण्यात येणारे ‘कॅटगर्ट’ हे औषधी कीट सोमवारी (दि. १५) जीवनधारा मेडिकल स्टोअर्समधून सीपीआर रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाइकांना विकण्यात आले; पण हे ‘कॅटगर्ट’ कीट सरकारने पुरविलेले व त्यावर ‘नॉट फॉर सेल’ असा स्पष्ट उल्लेख असतानाही ते खासगी मेडिकल स्टोअर्समधून विकले कसे गेले?

जीवनधारा मेडिकल स्टोअर्समधील औषधसाठ्याची अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी (दि. १६) दिवसभर तपासणी केली. ‘जीवनधारा’ला औषध पुरवठा करणाºया येथील महाराणा प्रताप चौकानजीकच्या ओम सर्जिकल्स या मुख्य वितरकावरही बुधवारी दुपारी अन्न औषध प्रशासनाने छापा टाकून तपासणी सुरू केली. सायंकाळी उशिरापर्यंत ही तपासणी सुरू होती.


गोपनीय पथक कार्यरत
सरकारने पुरविलेली औषधे खासगी औषध दुकानांतून विकली कशी जातात? ती औषधे तेथे कशी पोहोचली? त्यामध्ये कोण-कोण सामील आहेत? याबाबत रॅकेट कार्यरत असल्याच्या संशयात भर पडल्याने या प्रकरणाची चौकशी करून त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे आदेश राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार ‘सीपीआर’मधील अधिकाºयांचे पथक कार्यरत केले असून, ते गोपनीय पद्धतीने माहिती गोळा करीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे.

अधिकाºयांवर दबाव : जीवनधारा या मेडिकल स्टोअर्सला औषध पुरवठा करणाºया ओम सर्जिकल या मुख्य वितरकावर छापा टाकून त्याच्या औषधसाठ्याची तपासणी सुरू असताना एका सामाजिक कार्यकर्त्याने अन्न व औषध प्रशासनाच्या तपासी अधिकाºयांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ही माहिती फोनवरून मुख्य कार्यालयास कळविल्यानंतर कार्यालयातील काही कर्मचारी तेथे गेले असता त्या सामाजिक कार्यकर्त्याने पलायन केले.

Web Title:  Printed on the main distributor of 'Vishvadhara'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.