संस्थात्मक अलगीकरणाला प्राधान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:23 AM2021-05-22T04:23:41+5:302021-05-22T04:23:41+5:30
कोल्हापूर : ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामसमित्या सक्रिय करा, पॉझिटिव्ह् आलेल्या रुग्णाला गृहअलगीकरणाऐवजी संस्थात्मक अलगीकरण करा, ६० ...
कोल्हापूर : ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामसमित्या सक्रिय करा, पॉझिटिव्ह् आलेल्या रुग्णाला गृहअलगीकरणाऐवजी संस्थात्मक अलगीकरण करा, ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी केल्या.
राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही दोन पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेलीच आहे. शिवाय मृत्यूदरदेखील जास्त आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंबंधी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सकाळी दूरदृष्यप्रणालीद्वारे ग्रामसमित्या, सरपंच, अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. फारुख देसाई उपस्थित होते.
ते म्हणाले, आपले गाव कोरोनामुक्त व्हावे, यासाठी प्रत्येक गावकऱ्याने योगदान द्यावे. मागीलवर्षीप्रमाणे आतादेखील ग्रामसमित्यांनी सक्रियपणे काम करावे. पॉझिटिव्ह रुग्ण गृहविलगीकरणात राहिल्याने त्यांच्यामुळे कुटुंबियांना संसर्ग होत आहे. त्यामुळे रुग्णांना गृहविलगीकरणात न ठेवता त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करा, याठिकाणी औषधे व सोयी-सुविधा पुरवा, त्यासाठी ग्राम दक्षता समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद करा किंवा गावातील दानशूर व्यक्तींची मदत घ्या, तपासण्यांचे प्रमाण वाढवा, ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या, त्यांचे स्वतंत्र नियोजन करा, लसीकरण केंद्रांवर गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्या. डॉ. योगेश साळे ायांनी कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेतला.
--