शासकीय, खासगी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्या : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 11:59 AM2019-11-26T11:59:14+5:302019-11-26T12:01:05+5:30

ज्येष्ठ नागरिकांबाबत संबंधित विभागाने कृती आराखडा महिन्याभरात तयार करावा. विविध विभागाने ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने सुविधा पुरवाव्यात.

 Prioritize Senior Citizens in Government, Private Hospitals: Collector | शासकीय, खासगी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्या : जिल्हाधिकारी

शासकीय, खासगी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्या : जिल्हाधिकारी

Next
ठळक मुद्दे  कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.  कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर : जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा देताना त्यांना रांगेत उभे न करता उपचारासाठी प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिले. याबाबत तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

जिल्हाधिकारी आयोजित जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, प्र. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विलास देशमुख, समाजकल्याण निरीक्षक संजय पवार, ‘सीपीआर’च्या अधीक्षक डॉ. तेजस्विनी सांगरूळकर, शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव विलास नांदवडेकर, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समितीचे अध्यक्ष डॉ. मानसिंगराव जगताप, शहर अध्यक्ष दिलीप पेटकर, संजय पाटील, फारूक देसाई, आदी प्रमुख उपस्थित होते.
डॉ. जगताप यांनी यावेळी ज्येष्ठ नागरिक समस्या निवारणाबाबत विविध मागण्या सादर केल्या.
यावर जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, ‘आरोग्य सुविधेबाबत ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे राहणार नाहीत, याची सर्वांनी काळजी घ्यावी. अतिदक्षता रुग्णांवरील उपचार वगळता शासकीय तसेच खासगी रुग्णालयांनीही ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्यावे. याबाबत समाजकल्याण विभागाने कोल्हापूर वैद्यकीय संघटनेला पत्र लिहावे. ज्येष्ठ नागरिकांबाबत संबंधित विभागाने कृती आराखडा महिन्याभरात तयार करावा. विविध विभागाने ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने सुविधा पुरवाव्यात.
 

 

Web Title:  Prioritize Senior Citizens in Government, Private Hospitals: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.