विकासाकामांबरोबर आरोग्यसेवेला प्राधान्य आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:22 AM2021-04-12T04:22:08+5:302021-04-12T04:22:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवा जलद व प्रभावीपणे मिळणे आवश्यक झाले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवा जलद व प्रभावीपणे मिळणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे विकासाबरोबर आरोग्यसेवेला प्राधान्य देण्यात येणार असून, करवीर तालुक्यातील ग्रामीण भागाला या रुग्णवाहिकेने हातभार लागेल, अशी आशा आमदार पी. एन. पाटील यांनी व्यक्त केली.
खुपिरे (ता. करवीर) येथील ग्रामीण रुग्णालयाला रुग्णवाहिका प्रदान कार्यक्रमात आमदार पी. एन. पाटील बोलत होते. यावेळी करवीर पंचायत समितीचे उपसभापती अविनाश पाटील, कुंभीचे माजी उपाध्यक्ष तुकाराम पाटील, माजी सरपंच प्रकाश चौगले, सरदार बंगे उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, कोरोना महामारीचे संकट पुन्हा गडद झाले आहे. जनतेला आरोग्य सेवा मिळण्यासाठी ग्रामीण रूग्णालयांनी आपले योगदान द्यावे. सर्वांनी शासनाने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी दादा बँकेचे संचालक कृष्णात कुंभार, बबलू पाटील, एस. पी. पाटील, सर्व संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो - खुपिरे (ता. करवीर) येथील ग्रामीण रुग्णालयाला आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. यावेळी तुकाराम पाटील, सरदार बंगे, प्रकाश चौगले, आदी उपस्थित होते.