शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:59+5:302021-06-02T04:18:59+5:30
जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी दरवर्षी परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात. साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परदेशातील बऱ्याच विद्यापीठांचे शैक्षणिक सत्र सुरू ...
जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी दरवर्षी परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात. साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परदेशातील बऱ्याच विद्यापीठांचे शैक्षणिक सत्र सुरू होते. यावर्षी जगातील अमेरिका, इंग्लंड आदी अनेक देशांत कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तेथील विद्यापीठांचे ऑफलाइन पद्धतीने शैक्षणिक कामकाज सुरू होणार आहे. कोरोनाच्या सध्याच्या काळामध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास, शिक्षणासाठी परदेशात राहण्यासाठी परवानगी दिली जाते; पण कोल्हापूर जिल्ह्यात सध्या प्राधान्याने ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस दिली जात आहे. त्यामुळे परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या या विद्यार्थ्यांना लस मिळत नाही. मुंबई, पुणेच्या धर्तीवर कोल्हापुरात देखील शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी या पत्राद्वारे केली आहे.