कचरा डेपोची समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:42 AM2021-02-06T04:42:43+5:302021-02-06T04:42:43+5:30

फोटो लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील सांगली रोडवर असलेल्या कचरा डेपो (मैलखड्डा) ला आमदार प्रकाश आवाडे यांनी गुरुवारी ...

Priority to solve the problem of waste depots | कचरा डेपोची समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य

कचरा डेपोची समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य

Next

फोटो

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील सांगली रोडवर असलेल्या कचरा डेपो (मैलखड्डा) ला आमदार प्रकाश आवाडे यांनी गुरुवारी भेट दिली. तेथील अडचणी जाणून घेऊन हा गंभीर बनलेला प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. दरम्यान, त्यालगत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचीही पाहणी केली.

शहरातील रस्ते, पाणी व आरोग्याशी संबंधित विविध प्रश्नांबाबत शासनदरबारी समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी आमदार आवाडे यांनी माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुसार गुरुवारी आसरानगर परिसरातील कचरा डेपोला भेट दिली. शहरातील दैनंदिन १२० टन कचरा याठिकाणी गोळा केला जातो. तेथे कचऱ्याचा ढीग साचला असून, प्रक्रिया करणारी यंत्रणा बंद पडली आहे. तसेच वारंवार या डेपोला आग लागून धुरामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. याप्रश्नी नागरिकांनी सातत्याने आवाज उठविला आहे. परंतु मार्ग निघाला नाही. या कचऱ्याच्या डोंगराप्रश्नी पालिकेला गांभीर्य नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. हा आठ एकर जमिनीवर असणारा कचरा डेपो अपुरा पडत आहे. त्याचा पुनर्वापर व्हावा, यासाठी पालिकेने घनकचरा योजनेंतर्गत २२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर एसटीपी प्रकल्पाला भेट दिली. तेथे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे आढळले. विशेष म्हणजे एरव्ही विनाप्रक्रिया सोडले जाणारे पाणी आज थोडीफार प्रक्रिया करून सोडले जात होते. त्यामुळे उपस्थितांमधील काहीजणांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, जि. प. सदस्य राहुल आवाडे, निरीक्षक विजय पाटील, आरोग्य सभापती संजय केंगार, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, सुनील पाटील, विठ्ठल चोपडे, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, आदी उपस्थित होते.

चौकट १२ फेब्रुवारीला बैठक

कचरा, रस्ते, पाणी, आरोग्य यासंदर्भात १२ फेब्रुवारीला नगरपालिकेच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये अडचणीची माहिती घेणे व सोडविण्याचे प्रयत्न तसेच शासनाकडे आवश्यक पाठपुरावा केला जाणार आहे.

फोटो ओळी ०४०२२०२१-आयसीएच-०२ इचलकरंजीतील सांगली रोडवरील कचरा डेपोला आमदार प्रकाश आवाडे यांनी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी राहुल आवाडे, संजय केंगार, दीपक सुर्वे, डॉ. सुनीलदत्त संगेवार आदी उपस्थित होते.

छाया-उत्तम पाटील

Web Title: Priority to solve the problem of waste depots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.