अधिकाºयांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य : नकवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 06:32 PM2017-10-05T18:32:50+5:302017-10-05T18:32:55+5:30
संवगार्तील पदोन्नती, जॉब चार्ट, ग्रेड वेतन इ.अधिकाºयांचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य राहील असे आश्वासन लेखा व कोषागारे, मुंबई विभागाचे सु. म. अ. नकवी यांनी दिले.
कोल्हापूर दि. ५ : संवगार्तील पदोन्नती, जॉब चार्ट, ग्रेड वेतन इ.अधिकाºयांचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य राहील असे आश्वासन लेखा व कोषागारे, मुंबई विभागाचे सु. म. अ. नकवी यांनी दिले.
कोल्हापूर जिल्ह्यास त्यांनी भेट दिली होती. या भेटीप्रसंगी ते बोलत होते. येथील जिल्हा कोषागारातील मेमोरिडींग पूर्ण झाल्यानंतर लेखा व कोषागारे, मुंबई विभागाचे सु. म. अ. नकवी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अधिका?्यांच्या समस्या जाणून घेवून त्या प्राधान्यक्रमाने सोडविण्याची हमी दिली.
जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक समिती सभागृहात आयोजित समारंभाप्रसंगी माजी संचालक स्थानिक निधी लेखा श्री काकासाहेब विधाते,जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिधडे, सहायक संचालक स्थानिक निधी लेखा धनाजी शिंदे, शिवाजी विदयापीठाचे मुख्य लेखाधिकारी अजित चौगुले आणि जिल्हयातील लेखाधिकारी व सहायक लेखाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी नकवी यांना कोल्हापूरी फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. लेखाधिकारी बा. म. जाधव यांनी संवगार्तील पदोन्नती, जॉब चार्ट, ग्रेड वेतन इ. समस्यांबाबत विवेचन केले काकासाहेब विधाते यांनी लेखाधिकाºयांची प्रशासनातील भूमिका, अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम यांनी आभार मानले.