ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य : फरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 05:05 PM2017-10-06T17:05:20+5:302017-10-06T17:05:20+5:30

जेष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असून त्यांना सदैव आदराची आणि सन्मानाची वागणूक देण्याबरोबरच त्याचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य राहील, असे प्रतिपादन महापौर हसिना फरास यांनी आज येथे बोलताना केले.

Priority to solve the problems of senior citizens: Faras | ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य : फरास

ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य : फरास

Next

कोल्हापूर, दि. ६ : जेष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असून त्यांना सदैव आदराची आणि सन्मानाची वागणूक देण्याबरोबरच त्याचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य राहील, असे प्रतिपादन महापौर हसिना फरास यांनी आज येथे बोलताना केले.


सामाजिक न्याय विभाग आणि महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाच्या पुढाकाराने सामाजिक न्याय भवन येथे आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिक दिन कार्यशाळेचा शुभारंभ महापौर हसिना फरास यांच्याहस्ते करण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पुनर्वसन अधिकारी अशोक पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिष जगताप, राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, विभागीय जात पडताळणीचे उप आयुक्त प्रशांत चव्हाण, समाज कल्याण सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. मानसिंगराव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.


ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा, त्यांची काळजी घ्या असा भावनिक सल्ला देवून महापौर हसिना फरास म्हणाल्या, आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांच्या अडी-अडचणी आणि समस्या महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून अधिक गतीने सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल.

महापालिकेकडील ज्येष्ठ नागरिकांचे असलेले प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी लवकरच आयुक्त व सर्व संबंधितासमवेत बैठक आयोजित केली जाईल. महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राचा प्रस्ताव प्राधान्य क्रमाने मार्गी लावला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तसेच ज्येष्ठ नागरिकांना महानगरपालिकेच्यावतीने केएमटीचा सवलतीचा पास, फिजिओथेरपी सेंटर अशा आरोग्य विषयक सुविधाही प्राधान्याने दिल्या जातील.


या प्रसंगी बोलताना जिल्हा पुनर्वसन अधिकारी अशोक पाटील म्हणाले, आई-वडील आणि जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 लागू करण्यात आला असून या अधिनियमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यावर महसूल प्रशासनाचा भर राहील.

जेष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असल्याने जेष्ठ नागरिकांचे राहणीमान सुसह्य व्हावे, आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्थ व्हाव्यात, त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी व जेष्ठ नागरिकांचे अधिकार याची जाणीव समाजाला आणि पाल्यांना होणे गरजेचे आहे. या कायद्यांतर्गंत जेष्ठ नागरिकांना त्यांच्या पाल्यांकडून निर्वाह खर्च देण्याची तरतूद असल्याचेही ते म्हणाले.


जिल्हा पुनर्वसन अधिकारी अशोक पाटील म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांचा नेहमीच आदरयुक्त सन्मान राखून त्यांचे पालन पोषण करणे पाल्याचे अद्य कर्तव्य आहे. जेष्ठ नागरिक ही समाजाची संपत्ती आहे.

जेष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी असलेल्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस 3 महिने तुरुंगवास अथवा 5 हजार रुपयांपर्यंचा दंड अथवा दोन्हीही शिक्षांची तरतूद असून या कायद्याची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच जेष्ठ नागरिकांच्या समस्या आणि अडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील.


राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद याप्रसंगी बोलताना म्हणाले, जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांना मोफत आरोग्याच्या सुविधा शासकीय रुग्णालयामधून प्राधान्यक्रमाने उपलब्ध करुन देण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग दक्ष राहील. सीपीआर रुग्णालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न राहील.


प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिष जगताप म्हणाले, जिल्हा परिषदे प्रशासनाकडील सर्व विभागाकडील ज्येष्ठ नागरिकांच्या असणाऱ्या समस्या सोडविण्यावर अधिक भर दिला जाईल. जिल्हा परिषदेच्या रमाई आवास व अन्य घरकुल योजनातून नियमानुसार ज्येष्ठ नागरिकांना घरकुले उपलब्ध करुन देण्याबाबत सकारात्मक भुमिका घेतली जाईल. जेष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वाचा घटक असून त्यांच्या आरोग्यासाठी आणि पोषणाबाबतत पाल्यांनी विशेष खबरदारी घेणे काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.


याप्रसंगी विभागीय जात पडताळणीचे उप आयुक्त प्रशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, तहसिलदार दिलीप सावंत, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. मानसिंगराव जगताप आदींची भाषणे झाली.


प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला समाज कल्याण सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यशाळेस डॉ. शिरोळे, समाज कल्याण निरिक्षक संजय पवार,केशव पांडव उपस्थित होते.

 

 

Web Title: Priority to solve the problems of senior citizens: Faras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.