सांगलीत काँग्रेसचे कार्यकर्ते उचलून भाजपने मिळविले यश : पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:02 PM2018-08-06T12:02:23+5:302018-08-06T12:04:47+5:30
भाजपने माणसे फोडा हे धोरण अवलंबिले आहे. त्यातूनच सांगली महापालिकेमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते उचलून भाजपने यश मिळविले आहे; परंतु हे यश अल्पकाळ असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
कोल्हापूर : भाजपने माणसे फोडा हे धोरण अवलंबिले आहे. त्यातूनच सांगली महापालिकेमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते उचलून भाजपने यश मिळविले आहे; परंतु हे यश अल्पकाळ असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुका या जानेवारी-फेब्रुवारीत होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
चव्हाण म्हणाले, भाजपने सुरुवातीपासूनच माणसे फोडून आपला पक्ष विस्ताराचे धोरण अवलंबिले आहे. सांगली महापालिका निवडणुकीत भाजपने पैशाचा वारेमाप वापर केला. तसेच कॉँग्रेसचे कार्यकर्ते उचलून त्यांना भाजपची उमेद्वारी देऊन यश संपादन केले; परंतु हे यश दिर्घकालीन नसून ते अल्पकाळ टीकणार आहे.
शेवटी पराभव हा पराभवच आहे; त्यामुळे कॉँग्रेसच्या पराभवाबाबत तेथील नेत्यांशी आज, उद्या भेट घेऊन चर्चा केली जाईल. यापूर्वी कोणी इव्हीएम मशिनवर चर्चा केली नाही; परंतु आताच या विरोधात आक्रोश होत आहे. हे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
ते पुढे म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र लढल्यास खर्च कमी होईल, ही भाजप सरकारची भूमिका अयोग्य आहे. आगामी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या विधानसभा निवडणुकांमध्ये चांगले यश मिळणार नाही, हे लक्षात आल्याने भाजप सरकार या निवडणुका एकत्रित घेण्याची भाषा बोलत आहे. लोकसभा निवडणूक ही डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता कमी असून ती जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे.