Kolhapur: गोकुळ शिरगाव येथे खासगी बसला आग, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 12:08 IST2024-10-26T12:07:20+5:302024-10-26T12:08:01+5:30
कोल्हापूर/गोकुळ शिरगांव : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत येथे एका खासगी बसला आग लागून एका प्रवाशाचा होरपळून ...

Kolhapur: गोकुळ शिरगाव येथे खासगी बसला आग, एकाचा मृत्यू
कोल्हापूर/गोकुळ शिरगांव : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत येथे एका खासगी बसला आग लागून एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले. मयूर पेट्रोल पंपासमोर काल, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृत प्रवाशाची ओळख पटलेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, ही बस बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने येत होती. कणेरीवाडी ते गोकुळ शिरगाव यादरम्यान बस च्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बस मधून धूर येण्यास सुरुवात झाली. यानंतर बसमधील प्रवाशाने धुराचा वास येताना क्लीनर आणि चालकाला सतर्क केले. यानंतर बसला आग लागल्याने चालक आणि क्लीनर ने बस तशी सोडून पळ काढला. यानंतर बसमधून प्रवाशांनी एकेक करून खाली उतरले. यामध्ये एका प्रवासाचा होरपळून मृत्यू झाला.
यानंतर गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, कागल औद्योगिक वसाहत आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर आग आटोक्यात आणली. उत्तरे तपासणीसाठी त्याचा मृतदेह कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे.