स्वयंप्रभा मंच स्पर्धेचा बक्षीस समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 10:39 AM2020-12-15T10:39:59+5:302020-12-15T10:40:38+5:30
Coronavirusunlock, kolhapurnews लॉकडाऊनच्या काळात महिलांना सकारात्मक कामात बांधून, निकोप स्पर्धा घेत त्यांच्यात आत्मविश्वास कायम ठेवण्याचे काम स्वयंप्रभा मंचने केले आहे असे गौरवोद्गार अवनि आणि एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी काढले.
कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळात महिलांना सकारात्मक कामात बांधून, निकोप स्पर्धा घेत त्यांच्यात आत्मविश्वास कायम ठेवण्याचे काम स्वयंप्रभा मंचने केले आहे असे गौरवोद्गार अवनि आणि एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी काढले.
लॉकडाऊनच्या काळातील विविध ऑनलाईन आणि काही प्रत्यक्ष स्पर्धा ह्यस्वयंप्रभा मंचह्णने घेतल्या होत्या. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात पार पडला. प्रास्ताविक सारिका बकरे यांनी केले. इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या रितू वायचळ, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण हेंद्रे यांनी यावेळी मत व्यक्त केले.
पाककला तज्ज्ञ मंजिरी कपडेकर, प्राजक्ता पै-शहापूरकर, संगीत दिग्दर्शक महेश हिरेमठ, दिग्दर्शक अजय कुरणे, गिर्यारोहक नितीन देवेकर, ग्राफिक डिझाइनर ऐश्वर्या तेंडुलकर यांनी विविध स्पर्धांचे परीक्षण केले होते. याप्रसंगी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शुभदा हिरेमठ पवार यांनी केले. आभार सोनाली जाधव यांनी मानले.