ग्रामपंचायत बिनविरोधसाठी माजी सैनिकाकडून दीड लाखाचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:17 AM2021-01-01T04:17:43+5:302021-01-01T04:17:43+5:30
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी येथील माजी सैनिक चंद्रकात कांबळे (सी.बी. कांबळे) यांनी स्वतः आवाहन करीत सहा महिन्यांची सुमारे ...
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी येथील माजी सैनिक चंद्रकात कांबळे (सी.बी. कांबळे) यांनी स्वतः आवाहन करीत सहा महिन्यांची सुमारे एक लाख ५१ रुपये पेन्शनची रक्कम बक्षीस म्हणून जाहीर केली आहे. शिवाय ते स्वतः सदस्यही असणार नाहीत, अशी घोषणा त्यांनी केली आहे. त्यातून सर्व गटांचे गटनेते, युवक, अपक्ष उमेदवार यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती त्यांनी केली. साके ग्रामपंचायत निवडणुकीच्या ११ जागांसाठी गावातून चार गट व अपक्षांसह तब्बल ९४ अर्ज दाखल झाले आहेत. प्रत्येक उमेदवाराचा निवडणुकीतील खर्च काढल्यास मोठ्या संख्येने निधी जमा होऊन गावच्या विकासात मोलाचे योगदान ठरू शकते. माजी जवान कांबळे यांच्या आवाहनाला साके येथील ग्रामस्थ व स्थानिक पुढारी किती प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.