हिंदुत्ववादी संघटनांकडून पूरग्रस्तांच्या घरासाठी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:19 AM2021-04-03T04:19:54+5:302021-04-03T04:19:54+5:30
कोल्हापूर- दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरामध्ये घर पडलेल्या पंचगंगा घाट परिसरात राहणाऱ्या नंदू सुतार या कार्यकर्त्यांच्या घर ...
कोल्हापूर- दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरामध्ये घर पडलेल्या पंचगंगा घाट परिसरात राहणाऱ्या नंदू सुतार या कार्यकर्त्यांच्या घर उभारणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी मदत केली आहे. दोन दिवसात आता घराचा स्लॅब पडणार आहे.
सुतार यांचे घर २०१९ च्या पुरामध्ये पडले. प्रशासनाकडून काही महिन्यानंतर त्यांना १ लाख ३० हजार रूपये मिळाले. मात्र त्यातील निम्मी रक्कम दुसऱ्या घरात राहण्यासाठीचे भाडे देण्यातच गेली. कोरोनामुळे हिंदुत्ववादी संघटनांकडून प्रतिवर्षी हाेणारे विशालगडावरील कार्यक्रम रद्द करण्यात आला होते. महाशिवरात्री ही साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय झाला होता. यातून शिल्लक राहिलेला निधी या घरासाठी वापरण्याचा निर्णय झाला. संभाजी उर्फ बंडा साळोखे, प्रसाद मोहिते, अवधूत भाटे, सिद्धार्थ कटकधोंड, सनी पेणकर, वैभव पोवार, अनिल चोरगे, मनिष शहा, संजय पाटील, ऋषिकेश कोकितकर, विनायक आवळे, नितेश कोकितकर यांच्या पुढाकारातून हे घर उभारले जात आहे.