पाणंद रस्त्याचा प्रश्न २७ वर्षांनी सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:18 AM2021-07-01T04:18:16+5:302021-07-01T04:18:16+5:30
कोल्हापूर : धुंदवडे पैकी चौधरवाडी (ता. गगनबावडा) येथील पाणंद रस्त्याचा प्रश्न २७ वर्षांनी सुटला. तहसीलदार डॉ. संगमेश कोडे व ...
कोल्हापूर : धुंदवडे पैकी चौधरवाडी (ता. गगनबावडा) येथील पाणंद रस्त्याचा प्रश्न २७ वर्षांनी सुटला. तहसीलदार डॉ. संगमेश कोडे व मंडल अधिकारी, तलाठी यांनी स्वत: रस्ता खुला करण्यासाठी पाणंद रस्त्याचे माप टाकून दिले.
येथील तुकाराम व आनंदी चांभार-पोवार यांची गट नंबर ५९३ येथील तीन एकर जमीन आहे. येथे ये-जा करण्यासाठी व कसण्यासाठी गावातील काही लोकांनी विरोध केला होता. त्याविरोधात गगनबावडा तहसीलदार कार्यालयासमोर चांभार यांनी जनावरांसह उपोषण केले केले. त्यावेळी तहसीलदार यांनी ६ महिन्यांत पाणंद खुली करण्याचे आश्वासन दिले होेते. तरीदेखील प्रश्न न सुटल्याने २०१७ मध्ये याबाबतचा दावा दाखल करण्यात आला. त्यावर तहसीलदार संगमेश कोडे यांनी स्वत: पाहणी करुन २०२० मध्ये पाणंद रस्ता खुला करण्यात आदेश दिला. मात्र कोरोनामुळे हे काम थांबले होते अखेर काही दिवसांपूर्वी त्यांच्यासह मंडल अधिकारी व तलाठी यांनी पाणंद रस्त्याचे माप टाकून दिले दुसऱ्याच दिवशी जेसीबीद्वारे रस्ता खुला करण्यात आला. अशा रितीने तब्बल २७ वर्षांनी या रस्त्याचा प्रश्न सुटला.
---