विकासाभिमुख कागलच्या समस्याही बेसुमार--कागल तालुका
By admin | Published: November 4, 2014 10:29 PM2014-11-04T22:29:38+5:302014-11-05T00:04:23+5:30
तालुक्यातील महत्त्वाच्या समस्या
जहाँगीर शेख - कागल --तीन नद्यांचे वरदान लाभलेला कागल तालुका आज जिल्ह्यात सर्वाधिक जमीन सिंचनाखाली असलेला तालुका आहे. चार साखर कारखाने, दोन दूध संघ, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, विविध शैक्षणिक केंद्रे, दळणवळणाच्या सुविधा यांनी तालुका आज प्रगतिपथावर आहे. मात्र, या प्रगतीबरोबरच काही समस्याही तितक्याच गंभीर झाल्या आहेत.
येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे येथे जसा रोजगार निर्माण झाला, तसा परिसराचा सामाजिक बाजही बदलला आहे. कागल, कसबा सांगाव परिसरात त्याचे परिणाम दिसत आहेत. औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक आणि कामगारांना शासनाकडून सहकार्याची गरज आहे. नवे प्रकल्प येण्याचे प्रमाण मंदावले आहेत. नागनवाडी जलसिंचन प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना पर्यायी जमीन मिळाली नसल्याने गेली चार वर्षे या प्रकल्पाचे काम थांबलेले आहे. हीच अवस्था दूधगंगा प्रकल्पाच्या कालव्याची आहे. तालुक्यातील या कालव्याची खोदाई झाली; पण गेली दहा वर्षे पुढची कामे ठप्प झाली आहेत. ज्या कालव्यांमध्ये पाणी सोडले जाते, त्याचे अस्तरीकरण झाले नसल्याने हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान होत आहे. कागल आणि मुरगूड ग्रामीण रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूरला जावे लागत आहे.तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचारी कार्यालयात पूर्णवेळ हजर नसतात. परिणामी, जनतेच्या कामांचा खेळखंडोबा आणि जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होत असल्याचे तालुक्यात चित्र आहे.
तालुक्यातील महत्त्वाच्या समस्या
सरकारी गायराने, पाणंदीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे... दिवसेंदिवस वाढच
महसूल विभाग, सिटी सर्व्हे विभाग, रेशन धान्य विभागातील कामकाजाबद्दल जनतेमध्ये रोष, जाणीवपूर्वक दिरंगाईमुळे नागरिक वेठीस
८६ पैकी केवळ ४२ गावांचाच सिटी सर्व्हे
पंचायत समितीला नव्या प्रशासकीय इमारतीची गरज
शेतकऱ्यांच्या रद्द झालेल्या कर्जमाफीमुळे शेतकरी आणि सेवा संस्था आर्थिक गर्तेत.
बुडीत पतसंस्थांमध्ये लोकांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत... कार्यवाही नाही.
कागल तालुका कृषी विभागाला स्वत:चे जागा कार्यालय नाही.
लिंगनूर, कापशी भागात स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज.
कागल तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा चिंताजनक.
कागल शहराच्या समस्या
कागल शहरासाठी सुधारित विकास आराखडा हवा
जयसिंगराव तलाव पाणलोट क्षेत्र निश्चितीकरणाचे काम रखडलेले
महामार्ग चौपदरीकरणातील कामाच्या
त्रुटीमुळे नागरिकांना त्रास
कागल ग्रामीण रुग्णालयात अद्ययावत
अपघात विभाग हवा
कागल पोलीस ठाणे इतिहासकालीन इमारतीत,
नव्या इमारतीची गरज
मुरगूड शहराच्या समस्या
मुरगूड शहराच्या हद्दवाढीची गरज
शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा
(पिण्याच्या) यंत्रणेची गरज
मुरगूड शहरात एकही
बगिचा नाही
मुरगूड बसस्थानकाची दुरवस्था - स्वतंत्र
डेपोची गरज
तहसील कार्यालयातील प्रतिज्ञापत्रे
मुरगूडमध्येच मिळावीत
पाणी समस्या शेतीसाठीची
तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला नागनवाडी प्रकल्प ४५ टक्के काम झाल्यानंतर रखडला आहे. या प्रकल्पासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनावरून हे काम थांबले आहे.
दूधगंगा प्रकल्पातून निढोरी शाखेतून निघालेले तीनही कालव्यांचे काम ठप्प आहे. काही ठिकाणी केवळ खोदाईच झालेली आहे, तर अस्तरीकरण नसल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.
शेती पंपाच्या वीजबिलाच्या आकारणीबद्दलही नाराजी.
पाणी समस्या पिण्यासाठीची
गावागावांत नळपाणी पुरवठा योजना झाल्या आहेत; पण त्या दर्जेदार नाहीत. जलस्वराज्य प्रकल्पातील बहुतांश योजना कुचकामी, परिणामी पाणीपुरवठ्यावर परिणाम, दूषित पाण्याचा पुरवठा.
ग्रामपंचायतींना पाणी योजना आणि रस्त्यावरील विजेची बिले भरणे अशक्य होत असल्याने वारंवार वीजपुरवठा तोडण्याचे
प्रकार होतात.
पंचतारांकित वसाहतीमध्ये नवीन प्रकल्प येईनात : दूधगंगा कालवा, नागनवाडी जलसिंचन प्रकल्पाचे कामही रखडले
जहाँगीर शेख ल्ल कागल
तीन नद्यांचे वरदान लाभलेला कागल तालुका आज जिल्ह्यात सर्वाधिक जमीन सिंचनाखाली असलेला तालुका आहे. चार साखर कारखाने, दोन दूध संघ, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, विविध शैक्षणिक केंद्रे, दळणवळणाच्या सुविधा यांनी तालुका आज प्रगतिपथावर आहे. मात्र, या प्रगतीबरोबरच काही समस्याही तितक्याच गंभीर झाल्या आहेत.
येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे येथे जसा रोजगार निर्माण झाला, तसा परिसराचा सामाजिक बाजही बदलला आहे. कागल, कसबा सांगाव परिसरात त्याचे परिणाम दिसत आहेत. औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक आणि कामगारांना शासनाकडून सहकार्याची गरज आहे. नवे प्रकल्प येण्याचे प्रमाण मंदावले आहेत. नागनवाडी जलसिंचन प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना पर्यायी जमीन मिळाली नसल्याने गेली चार वर्षे या प्रकल्पाचे काम थांबलेले आहे. हीच अवस्था दूधगंगा प्रकल्पाच्या कालव्याची आहे. तालुक्यातील या कालव्याची खोदाई झाली; पण गेली दहा वर्षे पुढची कामे ठप्प झाली आहेत. ज्या कालव्यांमध्ये पाणी सोडले जाते, त्याचे अस्तरीकरण झाले नसल्याने हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान होत आहे. कागल आणि मुरगूड ग्रामीण रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूरला जावे लागत आहे.
तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचारी कार्यालयात पूर्णवेळ हजर नसतात. परिणामी, जनतेच्या कामांचा खेळखंडोबा आणि जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होत असल्याचे तालुक्यात चित्र आहे.