अकरावीच्या ‘सीईटी’साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:25 AM2021-07-27T04:25:24+5:302021-07-27T04:25:24+5:30

शिक्षण मंडळाच्यावतीने दि. २१ ऑगस्टला सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. पहिल्या ...

The process of filling up the application for the 11th CET is underway | अकरावीच्या ‘सीईटी’साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

अकरावीच्या ‘सीईटी’साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

Next

शिक्षण मंडळाच्यावतीने दि. २१ ऑगस्टला सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी अर्ज करण्यास विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद लाभला. या प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी काही विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनवरून आणि बहुतांश विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील नेटकॅफे आणि इंटरनेटची सुविधा असणाऱ्या ठिकाणी जाऊन शिक्षण मंडळाने दिलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सकाळपासून विद्यार्थ्यांना सर्व्हर डाऊनच्या तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला. त्यानंतर शिक्षण मंडळाने अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित केली आणि तांत्रिक अडचण दूर करण्याचे काम सुरू केले. ते पूर्ण झाल्यानंतर सोमवारी दुपारी तीनपासून अर्ज भरण्याचे नवीन संकेतस्थळ (https://cet.11thadmission.org.in) उपलब्ध करून दिले. त्यानुसार शहरातील विविध नेटकॅफेमध्ये अर्ज भरण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली. दि. २ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

प्रतिक्रिया

सीईटीसाठी अर्ज भरण्यातील तांत्रिक अडचण दूर होऊन सोमवारपासून नवीन संकेतस्थळ उपलब्ध झाले. पाच मिनिटांमध्ये अर्ज भरून होत आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.

-ऋषिकेश पाटील, नेटकॅफे चालक, निवृत्ती चौक.

चौकट

अर्ज भरण्यासाठी हे आवश्यक

विद्यार्थ्यांच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा बैठक क्रमांक, आईचे नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड, ई-मेल.

फोटो कोलडेस्कवर पाठविला आहे

ओळी : कोल्हापुरात सोमवारी इयत्ता अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निवृत्ती चौक परिसरातील नेटकॅफेमध्ये गर्दी केली.

Web Title: The process of filling up the application for the 11th CET is underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.