कोल्हापुरातील पैलवान महाराष्ट्र केसरी झाल्यास हत्तीवर मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:27 AM2021-02-24T04:27:14+5:302021-02-24T04:27:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, उचगाव : २१ वर्षांत कुस्ती पंढरी कोल्हापुरात महाराष्ट्र केसरीची गदाच नाही, ही खेदजनक गोष्ट आहे. ...

Procession on elephant if the wrestler from Kolhapur becomes Maharashtra Kesari | कोल्हापुरातील पैलवान महाराष्ट्र केसरी झाल्यास हत्तीवर मिरवणूक

कोल्हापुरातील पैलवान महाराष्ट्र केसरी झाल्यास हत्तीवर मिरवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, उचगाव : २१ वर्षांत कुस्ती पंढरी कोल्हापुरात महाराष्ट्र केसरीची गदाच नाही, ही खेदजनक गोष्ट आहे. त्यात एक वर्ष झालं लॉकडाऊनमुळे तालमी बंद आहेत. महाराष्ट्र केसरी पैलवान होईल त्याची हत्तीवरून मिरवणूक व पाचशे किलो साखर वाटप करण्याचा मनोदय उचगावातील कुस्ती पैलवान जयवंत पाटील (वस्ताद) यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

कुस्तीच्या आखाड्यातील पैलवानांमध्ये स्पर्धा जोरात सुरू आहे. महाराष्ट्र केसरी पैलवान होणे ही चेष्टा नाही. मी स्वतः कुस्ती या खेळासाठी घराचा तिसरा व चौथा मजला विनामूल्य तालमीसाठी दिला आहे. कुस्ती पंढरी कोल्हापुरात काही हौशी पैलवान आहेत. कोणतेही शासकीय, राजकीय अनुदान मिळालेले नसल्याने स्वतःच्या खर्चातून व कुस्तीच्या प्रेमापोटी १५ लाख रुपये खर्च करून जवळजवळ तब्बल दोन मजली इमारत विनामूल्य पैलवानसाठी सरावासाठी दिल्या आहेत. उचगाव आखाड्यात जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मुले यात कुस्तीगीर म्हणून सराव करत आहेत. पत्नी अनिता जयवंत पाटील यांनी यापूर्वी २९ मिनिटात साडेचारशे सपाटे मारलेले आहेत. कुस्तीचेही वेड त्यांना आहे. दोन तासात सलग अकराशे अकरा सूर्यनमस्कार त्यांनी घातलेले आहेत. मास्टर ॲथलेटिक्समध्ये दोन वेळा नॅशनल चॅम्पियन झालेली आहे. त्यांची इंटरनॅशनलसाठी निवडही झालेली आहे. त्याच पद्धतीने आयापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये ३९ गोल्ड मेडल मिळवलेले आहेत आणि आता २१ किलोमीटर आणि ४२ किलोमीटर प्रॅक्टिस चालू आहे. २०२० ला झालेल्या केरळ नॅशनल स्पर्धेत त्यांनी चार गोल्ड मिळवलेले आहेत. आता तिचे वय ४८ आहे.

फोटो ओळ २३ उचगाव कुस्ती

: उचगाव येथील पैलवान जयवंत पाटील यांच्या स्वखर्चातून साकारलेल्या कुस्ती आखाड्यात सराव करताना महिला कुस्तीगीर.

Web Title: Procession on elephant if the wrestler from Kolhapur becomes Maharashtra Kesari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.