घनसाळचे निर्यातयोग्य दर्जेदार उत्पादन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:25 AM2021-02-11T04:25:19+5:302021-02-11T04:25:19+5:30
आजरा : आजरा घनसाळचे सेंद्रिय पद्धतीने निर्यातयोग्य दर्जेदार उत्पादन करा. जागतिक बाजारपेठेत मागणी वाढून शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, असे ...
आजरा : आजरा घनसाळचे सेंद्रिय पद्धतीने निर्यातयोग्य दर्जेदार उत्पादन करा. जागतिक बाजारपेठेत मागणी वाढून शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, असे स्पष्ट प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. दाभिल (ता. आजरा) येथे घनसाळ भात उत्पादन वाढीसाठी आयोजित शेतकरी प्रशिक्षणात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत होते.
नोंदणीकृत घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांचा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आत्माच्या प्रकल्प संचालक सुनंदा कुराडे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार कदम यांनी आजरा घनसाळ उत्पादन वाढ, सेंद्रिय शेती याबाबत मार्गदर्शन केले. शेतकरी मंडळाचे उपाध्यक्ष संताजी सोले यांनी ऊसपिकापेक्षा घनसाळ फायदेशीर असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास सरपंच गवळी, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत, उपतालुकाप्रमुख संजय पाटील, सी. आर. देसाई, हिंदुराव कालेकर यासह दाभिल, गवसे, पेरणोली, शेळप, खेडगे, पारपोली, किटवडे, घाटकरवाडी, लिंगवाडी, आंबाडे येथील शेतकरी उपस्थित होते.
-------------------------------
* फोटो ओळी : घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करताना आमदार प्रकाश आबिटकर. शेजारी संभाजी सावंत, सुनंदा कुराडे, नंदकुमार कदम, आदी उपस्थित होते.
क्रमांक : १००२२०२१-गड-०१