कडुनिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:31 AM2021-06-16T04:31:36+5:302021-06-16T04:31:36+5:30

आदर्श सहेली मंचच्या वतीने या कडुनिंबाच्या पानांचे संकलन करून, ही पाने वाळवून, त्यापासून पावडर तयार करण्यात आली. कागल-हातकणंगले पंचतारांकित ...

Production of grain storage pellets from neem leaves | कडुनिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती

कडुनिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती

Next

आदर्श सहेली मंचच्या वतीने या कडुनिंबाच्या पानांचे संकलन करून, ही पाने वाळवून, त्यापासून पावडर तयार करण्यात आली. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील बी वेल फार्मास्युटिकल कंपनीने या कडुनिंबाच्या पाल्याच्या गोळ्या विनामूल्य करून देण्यात आल्या. निसर्गमित्र संस्थेने पर्यावरणपूरक पॅकिंग करून संस्थेकडे निर्माल्य जमा केलेल्या निसर्गप्रेमींना या गोळ्या सदिच्छा भेट म्हणून वितरित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ‘निसर्गमित्र’चे अनिल चौगुले यांनी दिली. या उपक्रमासाठी विलास डोर्ले, यश चौगुले, राणिता चौगुले, पराग केमकर यांनी योगदान दिले.

चौकट

उपक्रमाचे तिसरे वर्ष

या गोळ्यांचा उपयोग साठवणुकीचे धान्य किडू नये, अळी होऊ नये आणि अधिक काळ सुरक्षित राहण्याकरिता होतो. या गोळ्या कडुनिंबाच्या असल्यामुळे त्या पूर्णतः नैसर्गिक आहेत. सध्या रासायनिक आणि आरोग्याला हानिकारक अशा पदार्थांचा साठवणुकीच्या धान्यावर मारा करून ते धान्य साठविले जाते; परंतु असे अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावर अनेक विघातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कडुनिंबाच्या गोळ्या या उत्तम पर्याय ठरत आहेत. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष असल्याचे चौगुले यांनी सांगितले.

फोटो (१५०६२०२१-कोल-निसर्गमित्र) : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने कडुनिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती केली आहे.

फोटो (१५०६२०२१-कोल-निसर्गमित्र ०१) : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने कडुनिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती केली आहे. या गोळ्या निसर्गप्रेमी कुटुंबांना वितरित केल्या आहेत.

===Photopath===

150621\15kol_1_15062021_5.jpg~150621\15kol_2_15062021_5.jpg

===Caption===

फोटो (१५०६२०२१-कोल-निसर्गमित्र) : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने कडुलिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती केली आहे.फोटो (१५०६२०२१-कोल-निसर्गमित्र ०१) : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने कडुलिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती केली आहे. या गोळ्या निसर्गप्रेमी कुटुंबांना वितरीत केल्या आहेत.~फोटो (१५०६२०२१-कोल-निसर्गमित्र) : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने कडुलिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती केली आहे.फोटो (१५०६२०२१-कोल-निसर्गमित्र ०१) : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने कडुलिंबाच्या पानांपासून धान्य साठवणुकीच्या गोळ्यांची निर्मिती केली आहे. या गोळ्या निसर्गप्रेमी कुटुंबांना वितरीत केल्या आहेत.

Web Title: Production of grain storage pellets from neem leaves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.