शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागातील प्राध्यापक ठरले मॅपाथोन चॅम्पियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 02:21 PM2021-03-19T14:21:56+5:302021-03-19T14:23:26+5:30
Shivaji University Kolhapur- मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेकनिकल एज्युकेशनमार्फत मॅपाथोन ही मपिंगसाठीची स्पर्धा फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये देशभरातून ५२२८ स्पर्धेक सहभागी झाले. त्यातून केवळ २५ स्पर्धकांना राष्ट्रीय मॅपाथोन चॅम्पियन म्हणून निवड करण्यात आली. त्यात शिवाजी विद्यापीठातील भूगोल अधिविभागातील शिक्षक प्रा. डॉ. सचिन पन्हाळकर, अभिजित पाटील, सुधीर पोवार आणि रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर : मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेकनिकल एज्युकेशनमार्फत मॅपाथोन ही मपिंगसाठीची स्पर्धा फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये देशभरातून ५२२८ स्पर्धेक सहभागी झाले. त्यातून केवळ २५ स्पर्धकांना राष्ट्रीय मॅपाथोन चॅम्पियन म्हणून निवड करण्यात आली. त्यात शिवाजी विद्यापीठातील भूगोल अधिविभागातील शिक्षक प्रा. डॉ. सचिन पन्हाळकर, अभिजित पाटील, सुधीर पोवार आणि रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी प्रा. पन्हाळकर व त्यांच्या टीमने ह्यफ्लड रिस्क असेसमेंट ऑफ पंचगंगा रिव्हरह्ण आणि ह्यलँडस्लाईड रिस्क असेसमेंट ऑफ एसडब्ल्यू महाराष्ट्रह्ण हे विषय निवडले. त्यातून त्यांनी कोल्हापूर आणि परिसरातील स्थानिक भौगोलिक समस्या नकाशांमधून सादर केल्या. कोल्हापूर शहरानजीक वाहणाऱ्या पंचगंगा नदीला येणाऱ्या पुराचा रिस्क झोन नकाशा उपग्रहीय माहिती आणि जीआयएस सॉफ्टवेअरचा वापर करून तयार केला.
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यादरम्यान असणाऱ्या पश्चिम घाटातील घाटरस्त्यांवर होणारे भूस्कलनही या नकाशांद्वारे त्यांनी सादर केले. या नकाशांसाठी प्रथमच भूगोल अधिविभागाने बारकोड प्रणालीचा वापर केला गेला. नकाशावरील बारकोड स्कॅन करताच मॅपमधील माहिती मोबाइलमध्ये असणाऱ्या गुगलमॅपवर दिसेल. अशा प्रकारचे तंत्रज्ञान या नकाशामधून सादर केले. त्याचा वापर या भागातील लोकवस्ती आणि प्रशासकीय अधिकारी यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी होऊ शकतो, हे त्यांनी मांडले. विद्यापीठातील या प्राध्यापकांचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी अभिनंदन केले.
अत्याधुनिक नकाशे तयार करण्याचे उद्दिष्ट
मॅपाथोन ही एक विशिष्ट स्थानबद्ध समस्येवर उपाययोजनेसाठी घेतलेली राष्ट्रीय स्थरावरील मॅपिंग स्पर्धा आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने संशोधनासाठी भारतीय उपग्रहांनी घेतलेली माहिती, भुवन, एनआरएससी, आदी प्लॅटफॉर्मवरून उपलब्ध करून दिली आहे. या माहितीमध्ये भारतीय संसाधने, शेती, हवामान, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामीण व शहरी नियोजन आणि भविष्यातील विकासाचे मार्ग ओळखण्याची क्षमता आहे. भारतीय रिमोट सेन्सिंग डेटाची क्षमता समजून घेणे आणि ओपन सोर्से सॉफ्टवेअरचा वापर करून भारतीय विभागांसाठी अत्याधुनिक नकाशे तयार करणे हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट होते.