‘खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक’ पतसंस्थेस १ कोटी ३६ लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:22 AM2021-04-17T04:22:51+5:302021-04-17T04:22:51+5:30
कोल्हापूर : येथील कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेस सन २०२०-२०२१ या वर्षामध्ये १ कोटी ३६ लाख ...
कोल्हापूर : येथील कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेस सन २०२०-२०२१ या वर्षामध्ये १ कोटी ३६ लाख ८१ हजार ७३९ रुपये इतका विक्रमी निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्ष महादेव डावरे यांनी शुक्रवारी दिली. पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे, ज्येष्ठ संचालक आनंदा हिरुगडे, शिवाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व संचालक मंडळ, सल्लागार समिती, कर्मचारीवर्ग यांच्या सहकार्याने संस्थेने प्रगती केली आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल २ कोटी ३ लाख ९१ हजार आहे. अहवाल सालात सुमारे ३०० कोटींची उलाढाल केली आहे. एनईएफटी, आरटीजीएस, क्यूआरकोड, मोबाइल बँकिंग, एकत्रित पासबुक, आदी सेवा सभासदांना दिल्या जाणार आहेत. संस्थेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांच्या सहकार्यामुळेच संस्था प्रगती करत आहे, असे अध्यक्ष डावरे यांनी सांगितले.