कसबा बावड्याच्या श्रीराम विकास संस्थेला ३७ लाखांचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:35 AM2021-02-23T04:35:51+5:302021-02-23T04:35:51+5:30

कसबा बावडा : येथील श्रीराम विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेला चालू आर्थिक वर्षात तब्बल ३७ लाख ...

Profit of Rs. 37 lakhs to Shriram Vikas Sanstha of Kasba Bawda | कसबा बावड्याच्या श्रीराम विकास संस्थेला ३७ लाखांचा नफा

कसबा बावड्याच्या श्रीराम विकास संस्थेला ३७ लाखांचा नफा

Next

कसबा बावडा : येथील श्रीराम विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेला चालू आर्थिक वर्षात तब्बल ३७ लाख २० हजार रुपयांचा नफा झाला आहे. तसेच संस्थेच्या सर्व १४ ही शाखा नफ्यात असून, लेखापरीक्षकांनी संस्थेला ‘अ’ वर्ग दिला आहे, अशी माहिती संस्थेचे सभापती धनाजी गोडसे यांनी संस्थेच्या ९२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. संस्थेच्या श्रीराम सांस्कृतिक भवनात ही सभा रविवारी पार पडली. संस्थेने दिवाळीच्या काळात सभासदांना १५ टक्के लाभांशाचे वाटप केले असून, संस्थेच्या ठेवींमध्ये दोन कोटींनी वाढ होऊन त्या आता २६ कोटींच्या घरात गेल्या असल्याचे गोडसे यांनी सांगितले. संस्थेने ११ कोटी ५० लाखांची गुंतवणूक केली आहे, तर संस्थेचा एकूण व्यवहार १७५ कोटींवर आहे. दरम्यान, विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी उपसभापती संतोष ठाणेकर, माजी नगरसेवक मोहन सालपे, व्यवस्थापक शरद उलपे, संचालक प्रशांत पाटील, प्रमोद पाटील, विलास पिंगळे, मदन जामदार ,प्रवीण लाड, राजीव चव्हाण, हरी पाटील, संतोष पाटील, संजय केंबळे, शिवाजी चौगले, कुंडलिक परीट, सुधाकर कसबेकर, जया उलपे, वनिता बेडेकर, नंदिनी रणदिवे, आदी उपस्थित होते.

चौकट:

१५ कोटी ५५ लाखांची पेट्रोल-डिझेलची विक्री...

संस्थेच्या सर्व १४ शाखा नफ्यात आहेत, तर संस्थेच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या पेट्रोल पंप विभागाने पेट्रोल व डिझेलची तब्बल १५ कोटी ५५ लाख रुपयांची विक्री केली आहे.

फोटो: २१ बावडा सोसायटी

१) येथील श्रीराम विविध कार्यकारी विकास सेवा संस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना संस्थेचे सभापती धनाजी गोडसे.

२) समोर उपस्थित सभासद वर्ग.

Web Title: Profit of Rs. 37 lakhs to Shriram Vikas Sanstha of Kasba Bawda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.