पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता हरपला
By admin | Published: March 22, 2015 10:35 PM2015-03-22T22:35:06+5:302015-03-23T00:41:48+5:30
भरमूअण्णा पाटील : सदाशिवराव मंडलिक यांना वाहिली श्रद्धांजली
चंदगड : आयुष्यभर पुरोगामी विचार तळागाळात रुजविले. वाईट प्रवृत्तीशी संघर्ष केला; पण विचारांना कधी मुरड घातली नाही. सर्वसामान्य जनतेशी प्रामाणिक राहत शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांशी कधी प्रतारणा केली नाही. स्व:कष्टावर तेजस्वी कर्तृत्व निर्माण करणाऱ्या या नेत्याच्या जाण्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सदाशिवराव मंडलिक यांच्या जाण्यामुळे पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता हरपला, अशा शब्दांत माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.
चंदगड पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या शोकसभेत ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रतिमेचे पूजन व अस्थिंचे दर्शन मान्यवरांच्या हस्ते झाले. शिवानंद हुंबरवाडी यांनी प्रास्ताविक करून मंडलिक यांच्या जीवनाचा आढावा घेतला.
यावेळी माजी आमदार नरसिंगराव पाटील, काँगे्रसचे तालुकाध्यक्ष नामदेव दळवी, ताम्रपर्णीचे अध्यक्ष सुरेशराव चव्हाण-पाटील, सभापती ज्योती पाटील, मल्लिकार्जुन मुंगेरी, नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महादेव पाटील, उपसरपंच सचिन बल्लाळ, नितीन पाटील, कक्षअधिकारी बाजीराव पाटील, व्ही. बी. नरवणे, युवा नेते प्रभाकर खांडेकर, महादेव गावडे, गोविंद पाटील, बाळू चौगुले, डी. टी. खांडेकर, सदानंद पाटील, एम. टी. कांबळे, एम. जे. पाटील, शिवाजी पाटील, वसंत सोनार, बाबासाहेब देसाई, माजी आमदार व्ही. बी. पाटील यांचीही श्रद्धांजलीपर भाषणे झाली.
यावेळी उपसभापती शांताराम पाटील, उदयकुमार देशपांडे, तालुका संघाचे राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पाटील, तुळसा तरवाळ, आदी उपस्थित होते.