प्रांतांच्या निषेधार्थ गडहिंग्लज कडकडीत बंद

By admin | Published: January 2, 2015 11:35 PM2015-01-02T23:35:10+5:302015-01-03T00:13:35+5:30

बेकायदेशीर वहिवाट : नागरिकांची एकजूट; मोर्चा काढून दिले मागणीचे निवेदन

Prohibited by the provinces, Gadhinglaj closed the cracks | प्रांतांच्या निषेधार्थ गडहिंग्लज कडकडीत बंद

प्रांतांच्या निषेधार्थ गडहिंग्लज कडकडीत बंद

Next

गडहिंग्लज : ५४ वर्षांपूर्वी प्रांतकचेरी सुरू करण्यासाठी नगरपालिकेकडून भाड्याने घेतलेली धर्मशाळा इमारत व जागेस बेकायदेशीररीत्या वहिवाटदार म्हणून परस्पर उपविभागीय अधिकारी यांचे नाव लावल्याबद्दल कडकडीत बंद पाळून गडहिंग्लजकरांनी प्रांताधिकाऱ्यांचा निषेध केला. मोर्चाने जाऊन प्रांताधिकारी व भूमिअभिलेख उपअधीक्षक यांना निवेदन दिले.
लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. नेहरू चौक, शिवाजी चौक, बाजारपेठ, वीरशैव बँक, मेनरोड, कांबळे तिकटी, अहिल्याबाई होळकर चौक, दसरा चौक या मार्गावर फिरून मोर्चा प्रांतकचेरीवर आला. याठिकणी सभा झाली.
मोर्चात आमदार हसन मुश्रीफ, नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी, राष्ट्रवादीचे गटनेते रामदास कुराडे, माजी नगराध्यक्ष बापू म्हेत्री, अकबर मुल्ला, दत्ता बरगे, राजन पेडणेकर व निरुपमा बन्ने, मजूर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष उदय जोशी, लायन्स क्लबचे अध्यक्ष आर. के. वांद्रे, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप माने, मनसे तालुकाध्यक्ष नागेश चौगुले, वीरशैव समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष राजशेखर दड्डी व उपाध्यक्ष बसवराज जमदाडे, ‘स्वाभिमानीचे’ अशोक पाटील, किसान सभेचे तालुकाध्यक्ष अमरनाथ घुगरी, बड्याचीवाडीच्या सरपंच गीता देसाई, गडहिंग्लज शहर किराणा भुसार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुनील तेली, शिक्षण मंडळ सभापती सुरेश कोळकी, भारतीय जैन संघटनेचे सुरेंद्र साळवी व महावीर दसूरकर, प्राचार्य जे. बी. बार्देस्कर, सतीश पाटील, प्रा. रमेश पाटील, सुनील चौगुले, बाळासाहेब घुगरे, हातगाडी खोकीधारक संघटनेचे अध्यक्ष दादू पाटील, गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष तानाजी मोहिते, काँगे्रसचे शहराध्यक्ष बसवराज आजरी, शिवाजीराव खोत, ‘दानिविप’चे संस्थापक रमजान अत्तार, प्राचार्य जे. बी. बारदेसकर, विक्रांत पावले, आदी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणा देऊन परिसर चांगलाच दणाणून सोडला होता. (प्रतिनिधी)

लक्ष्यवेधी घोषणा, जेसीबी व बंदोबस्ताची चर्चा
मनसे तालुकाध्यक्ष नागेश चौगुले यांनी मोर्चाच्यावेळी प्रांतकचेरीच्या दारात जेसीबी आणला होता. लक्ष्यवेधी घोषणा, जेसीबी बंदोबस्ताची दिवसभर शहरात चर्चा होती.
भूमिअभिलेख धारेवर
भूमिअभिलेख कार्यालयावर निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर मोजणी व फेरफाराची नोटीस नगरपालिकेला का दिली नाही? असा जाब विचारून माजी नगराध्य्...अन् निवेदन स्वीकारले
मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारायला पहिल्यांदा तहसीलदार हनुमंत पाटील आले. मात्र, प्रांतकचेरीवर मोर्चा असल्यामुळे प्रांतांनीच निवेदन स्वीकारावे, असा आग्रह झाला. त्यावेळी प्रांतांसमोर कोर्ट केसीस सुरू असल्याचा निरोप आला. आक्रमक आंदोलकांनी रास्ता रोकोचा इशारा दिला. त्यामुळे सहायक जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी स्वत: गेटवर येऊन निवेदन स्वीकारले.

‘लोकमत’च्या बातम्यांची चर्चा
‘लोकमत’ने प्रांतकचेरीच्या जागेला वहिवाटदार म्हणून नाव लावण्याच्या हालचालीपासूनच्या सर्व घडामोडींबाबत सडेतोड बातम्यांद्वारे प्रकाशझोत टाकला. याप्रश्नी सुरू केलेल्या ‘प्रांतकचेरीची कूळकथा’ या मालिकेचे झेरॉक्स मोर्चादरम्यान शहरात वाटण्यात आले. ाक्ष अकबर मुल्ला यांनी शिरस्तेदार समीर खडकवाले यांना धारेवर धरले.

Web Title: Prohibited by the provinces, Gadhinglaj closed the cracks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.