वकिलांनी विजय मनुगडेवर शाई मारुन केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 06:57 PM2017-08-29T18:57:48+5:302017-08-29T19:05:16+5:30
कोल्हापूर : राजेंद्रनगर परिसरातील एका शाळेमधील मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी हॉकीचा प्रशिक्षक संशयित विजय मनुगडे याच्यावर मंगळवारी न्यायसंकुलच्या आवारात वकीलांनी शाई मारुन निषेध केला. यावेळी वकिलांनी मनुगडेला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी केली.
गेल्या आठवड्यात शाळेतील मुलींवर अत्याचार प्रकरणी संशयित विजय मनुगडे (वय ३६,रा.देवकर पाणंद) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. मंगळवारी दूपारी त्याला पोलिस न्यायालयात आणत असताना न्यायसंकुल इमारतीच्या पाठिमागे वकील गेले. त्यावेळी मनुगडेला पोलिस न्यायालयात बंदोबस्तात नेत असताना त्याला संतप्त वकीलांनी त्याच्या अंगावर शाई मारुन त्याचा निषेध केला. त्यानंतर त्याला पोलिसांनी न्यायालयात नेले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस म्हणाले, हा प्रकार शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारा आहे. त्याचे हे कृत्य घृणास्पद आहे. त्यामुळे न्यायालयाने त्याला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी.
अॅड. मीना पोवार म्हणाल्या, हा प्रकार म्हणजे समस्त महिला वर्गांचा अपमान आहे. त्याला शिक्षा व्हावी. यामध्ये जिल्हा बार असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष अॅड. नारायण भांदिगरे, माजी अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे, अॅड. प्रकाश मोरे यांच्यासह अॅड. राजेंद्र मंडलिक, अॅड. अरुण पाटील, अॅड. दीपक पाटील, अॅड. अतुल जाधव, अॅड. पंडितराव मरळकर, अॅड. विजय महाजन ,अॅड. शिवराम जोशी आदींचा सहभाग होता.