चंदगडला वकिलांचे काम बंद; नेसरीत मोर्चा : मराठा आरक्षणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:57 AM2018-08-02T00:57:46+5:302018-08-02T00:57:53+5:30

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विविध मागण्यांसाठी नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील सकल मराठा समाज व सर्वपक्षीयांतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. शाळा, महाविद्यालय, पतसंस्था यांनी बंद

 Prohibition of lawyers for Chandgad; Nessiri Morcha: Demand for Maratha Reservation | चंदगडला वकिलांचे काम बंद; नेसरीत मोर्चा : मराठा आरक्षणाची मागणी

चंदगडला वकिलांचे काम बंद; नेसरीत मोर्चा : मराठा आरक्षणाची मागणी

Next
ठळक मुद्देविविध संघटनांचा पाठिंबा; रास्ता रोको, गारगोटीत तिसºया दिवशीही ठिय्या रुई, मिणचेतील आंदोलकांचा ठिय्या

नेसरी : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विविध मागण्यांसाठी नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील सकल मराठा समाज व सर्वपक्षीयांतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. शाळा, महाविद्यालय, पतसंस्था यांनी बंद पाळला. सरसेनापती प्रतापराव गुर्जरांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. नांदवडेकर गल्ली, बाजारपेठ मार्गे घोषणा देत बसस्थानकाजवळ मोर्चा आला. येथे सुमारे तासभर रस्त्यावर ठिय्या मांडला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

जि. प. सदस्य अ‍ॅड. हेमंत कोलेकर म्हणाले, मराठा समाज हा मोठा समाज आहे. मात्र, आरक्षण नसल्याने त्यांना कुठेही संधी मिळत नाही.
शिवसेना संघटक संग्रामसिंह कुपेकर म्हणाले, शासनाने मराठा समाजाच्या भावना समजून घ्याव्यात. मूक मोर्चा काढून त्यांनी एक आदर्श ठेवला; मात्र त्यांना योग्य तो न्याय मिळत नसल्याने कायदा हातात घेण्याची वेळ आली आहे. तेव्हा शासनाने याची गंभीरपणे दखल घ्यावी. क्रांती दिनापूर्वी निर्णय न झाल्यास उग्र आंदोलन छेडू.

पं. स. सदस्य विद्याधर गुरबे म्हणाले, शिक्षण आणि नोकरीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे. इतर समाजाचे आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजासाठी वेगळे आरक्षण द्या.

यावेळी कृष्णराव वार्इंगडे, कार्तिक कोलेकर, सरपंच आशिष साखरे, प्रशांत नाईक, अशोक पांडव, सागर सावंत, सुरेश असवले यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपसरपंच अब्दुलरौप मुजावर, अमर हिडदुगी, प्रकाश मुरकुटे, दयानंद नाईक, जोतिबा भिकले, विलास हल्याळी, जयसिंग नाईक, दयानंद बोरगल्ली, तौफिक वाटंगी, असलम बागवान, शहीद वाटंगी यांच्यासह सर्व जाती-धर्माचे समाजबांधव या आंदोलनात सहभागी होते.

आजऱ्यात मुस्लिम विकास, भ्रष्टाचार जनजागृतीचा पाठिंबा
आजरा : ‘मराठा समाजाला आरक्षण द्या’ अशी मागणी भारतीय मुस्लिम विकास परिषद व भ्रष्टाचार जनजागृती समितीने केली. त्यांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीने म्हटले आहे की, मराठा समाजाची मागणी रास्त असून, तत्काळ आरक्षण द्यावे. आरक्षण देऊन संघर्ष टाळण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. निवेदनावर मुख्य संघटक कॉ. संग्राम सावंत, प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे, प्रमोद पाटील, बबलू शेख, मजिद मुल्ला यासह भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय भोसले, तालुकाध्यक्ष प्रकाश पोवार, शहरप्रमुख अशोक जाधव, महिला अध्यक्षा कविता देसाई, वृषाली पाटील, अंतोन बार्देस्कर, सुजित देसाई, आदींच्या स्वाक्षºया आहेत.
 

Web Title:  Prohibition of lawyers for Chandgad; Nessiri Morcha: Demand for Maratha Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.