शाहूवाडी तालुक्यातील पर्यटनाला चालना देणार

By admin | Published: September 11, 2016 12:16 AM2016-09-11T00:16:32+5:302016-09-11T00:25:39+5:30

चंद्रकांतदादा : पं. स. इमारतीचे उद्घाटन

To promote tourism in Shahuwadi taluka | शाहूवाडी तालुक्यातील पर्यटनाला चालना देणार

शाहूवाडी तालुक्यातील पर्यटनाला चालना देणार

Next

मलकापूर : शाहूवाडी तालुक्याच्या पर्यटनात्मक विकासाला चालना देण्यासाठी शासनाकडून निधीची उपलब्धता करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
शाहूवाडी येथे पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी होते. यावेळी आमदार सत्यजित पाटील, आमदार उल्हास पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार राऊ पाटील, संजीवनीदेवी गायकवाड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार राजू शेट्टी म्हणाले, शासनाने डोंगरी भागासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, पर्यटनाच्या माध्यमातून येथे रोजगार उपलब्ध होणार आहे. भूदान चळवळ चालविणाऱ्या बर्की गावाला शासनाने विशेष मदतनिधी जाहीर करावा, शासकीय निवास्थानांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करावा.
आमदार सतेज पाटील म्हणाले, ग्रामपंचायतीबरोबर पंचायत समितींना विशेष निधी देऊन शासनाने सक्षम करावे.
आमदार सत्यजित पाटील म्हणाले, चंद्रकांतदादा यांच्यामुळे तालुक्याला २४ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, उपसभापती संगीता पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या भाग्यश्री गायकवाड, लक्ष्मी पाटील, आकांक्षा पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर, भाजपचे राजू प्रभावळकर, अजितसिंह काटकर, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, जयवंतराव काटकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार चंद्रशेखर सानप, पोलिस निरीक्षक अनिल गाडे उपस्थित होते. सभापती पंडितराव नलवडे यांनी प्रास्ताविक केले. गटविकास अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी स्वागत केले. पंचायत समितीचे सदस्य नामदेव पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


लाडके आमदार
आमदार सतेज पाटील आपल्या भाषणात म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात आमदार सत्यजित पाटील पालकमंत्र्यांचे लाडके आमदार होते. दादा तुमचेदेखील ते लाडके आमदार आहेत. त्याबाबतीत सत्यजित हुशार आहेत, अशी कोपरखळी मारली.
गाठ पडली नाही
गेल्या जिल्हा व पंचायत समितीच्या निवडणुकीत सरूडकर व कर्णसिंह गायकवाड गटाची युती होती. निवडणुकीत सत्तादेखील आली; मात्र एक दोन कार्यक्रम वगळता आजच एका व्यासपीठावर सर्वांची गाठ पडली, असे आमदार सत्यजित पाटील यांनी गायकवाड गटास टोला लगावला.

Web Title: To promote tourism in Shahuwadi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.