कोल्हापूर जिल्ह्यातील १४ सहायक निरीक्षकांना बढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:21 AM2019-06-11T01:21:55+5:302019-06-11T01:23:05+5:30

येथील पोलीस दलातील १४ सहायक पोलीस निरीक्षकांची सेवा ज्येष्ठतेनुसार नि:शस्त्र पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती बदली करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे ५०० सहायक निरीक्षकांना पदोन्नती बदल्यांचे आदेश सोमवारी काढण्यात आले. पदोन्नती बदली झालेल्या

Promoting 14 Assistant Observers in Kolhapur District | कोल्हापूर जिल्ह्यातील १४ सहायक निरीक्षकांना बढती

कोल्हापूर जिल्ह्यातील १४ सहायक निरीक्षकांना बढती

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस महासंचालक जायसवाल : बदली अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्ततेचे आदेश

कोल्हापूर : येथील पोलीस दलातील १४ सहायक पोलीस निरीक्षकांची सेवा ज्येष्ठतेनुसार नि:शस्त्र पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती बदली करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे ५०० सहायक निरीक्षकांना पदोन्नती बदल्यांचे आदेश सोमवारी काढण्यात आले. पदोन्नती बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करा, असे आदेश पोलीस महासंचालक सु. कु. जायसवाल यांनी राज्यातील पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

पोलीस दलामध्ये सहायक निरीक्षक पदाची सहा वर्षे कार्यकाल संपून गेले एक वर्ष पदोन्नतीच्या प्रतीक्षेत अधिकारी होते. सेवाज्येष्ठतेनुसार राज्यातील ५०० सहायक निरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश सोमवारी पोलीस महासंचालक जायसवाल यांनी काढले. त्यामध्ये जिल्ह्णातील १४ सहायक निरीक्षकांचा समावेश आहे. धनंजय विठ्ठल पिंगळे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज), शहाजी आकाराम निकम (लोहमार्ग, मुंबई), विठ्ठल शिवाजी दराडे (नागरी हक्क संरक्षण विभाग मुंबई), संजीवकुमार दत्तात्रय झाडे (पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला), सतीश हिंदुराव शिंदे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, सांगली), रवींद्र मानसिंग कदम (पुणे शहर), रिजवाना गुलाब नदाफ, तृप्ती गंगाधर देशमुख, नामदेव गणपतराव शिंदे (तिघेही मुंबई शहर), कुमार गुलाबराव घाडगे (पुणे शहर), सचिन दिनकर पाटील (पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर), समीर सूर्यकांत गायकवाड (नागपूर शहर), महामार्ग सुरक्षा पथकाचे अविनाश दिनकर पोवार (लोहमार्ग मुंबई), कुमार रामचंद्र कदम (राज्य गुन्हे विभाग कोकण-२).

स्थानिक सहायक निरीक्षकांची फिल्डिंग
पदोन्नतीवर बढती झालेले अधिकारी कार्यमुक्तझाल्यानंतर करवीर, इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखा, मुरगूड, जयसिंगपूर, आदी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्तीहोण्यासाठी दुसऱ्या फळीतील सहायक निरीक्षकांनी ह्यदादाह्ण साहेबांपर्यंत फिल्डिंग लावली आहे.

कोल्हापूरला येणारे अधिकारी
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे
संजय जीवन पतंगे (कोल्हापूर पोलीस मुख्यालय), पुणे येथून श्रीशैल सिद्रमप्पा गजा (जिल्हा जात पडताळणी विभाग, कोल्हापूर)

 

Web Title: Promoting 14 Assistant Observers in Kolhapur District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.