‘शाहू शेतकरी’चा उद्या शिरोळ, हातकणंगलेतून प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:24 AM2021-04-21T04:24:26+5:302021-04-21T04:24:26+5:30
कोल्हापूर : ‘गोकूळ’च्या निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचा उद्या, गुरुवारी प्रचार प्रारंभ होत आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्याची ...
कोल्हापूर : ‘गोकूळ’च्या निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचा उद्या, गुरुवारी प्रचार प्रारंभ होत आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्याची सभा घेतली जाणार असून त्यानंतर तीन-चार तालुक्याची एकत्रित सभा घेतल्या जाणार आहेत.
‘गोकूळ’साठी मंगळवारी दोन्ही आघाड्यांच्या नावांची घोेषणा झाली आहे. २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात असून सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी व विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीमध्ये सरळ लढत होत आहे. शाहू शेतकरी आघाडीचा प्रचाराचा प्रारंभ उद्यापासून होणार आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील ठरावधारकांचा एकत्रित मेळाव्यापासून प्रचाराचा प्रारंभ होणार आहे. शुक्रवारी (दि. २३) राधानगरी, भुदरगड, कागल तालुक्याचा मेळावा होणार आहे. शनिवार (दि. २४) उर्वरित तालुक्यांचा मेळावा होणार आहे.
‘शाहू शेतकरी’च्या उमेदवारांकडून चुयेकरांना अभिवादन
राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या उमेदवारांनी मंगळवारी ‘गोकूळ’दूध प्रकल्प येथील स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सर्व उमेदवारांनी आप्पाचीवाडी येथे जाऊन हालसिद्धनाथाचे दर्शन घेतले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ ते हालसिद्धनाथाच्या दर्शनाने करतात.
फोटो ओळी : राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर मंगळवारी उमेदवारांनी ‘गोकूळ’ दूध प्रकल्प येथे जाऊन आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (फोटो-२००४२०२१-कोल-शाहू शेतकरी) (छाया-राज मकानदार)